शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

मारुतीरायांच्या अवहेलनेने देश दुभंगेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:42 IST

जे मारुतीराय सेवाभाव, शक्ती, युक्तीचे प्रणेते आहे, साहित्यिक आहे, गुप्तचर आहे, ज्यांच्या ठायी व्यापकता आहे, ज्यांना अष्टसिद्धी प्राप्त असूनही ते केवळ लंगोटधारी आहे, कोणताही स्वार्थ, गर्व वा अहंकार ज्यांच्या अंगी नाही, त्यांचे हे आदर्श जगासमोर मांडण्याऐवजी आजकाल कोणीही उठतो आणि मारुतीरायांचे नाव घेऊन त्यांना जातीधर्मात वाटू पाहत आहे.

जे मारुतीराय सेवाभाव, शक्ती, युक्तीचे प्रणेते आहे, साहित्यिक आहे, गुप्तचर आहे, ज्यांच्या ठायी व्यापकता आहे, ज्यांना अष्टसिद्धी प्राप्त असूनही ते केवळ लंगोटधारी आहे, कोणताही स्वार्थ, गर्व वा अहंकार ज्यांच्या अंगी नाही, त्यांचे हे आदर्श जगासमोर मांडण्याऐवजी आजकाल कोणीही उठतो आणि मारुतीरायांचे नाव घेऊन त्यांना जातीधर्मात वाटू पाहत आहे. ज्यांचा मारुतीरायांविषयी तिळमात्र अभ्यास नाही, अशा या प्रवृत्ती त्यांच्यांविषयी रोजरोज नवनवी कोणताही आधार नसलेली बाष्कळ भाष्ये करून देशाला संकटात टाकत आहेत. या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, मारुतीरायांच्या काळातील जातीधर्माचा भेदभाव नसलेले, सर्वांना स्वाभिमान आणि आनंदाने भयमुक्त वातावरणात राहता येईल, असे रामराज्य छत्रपती शिवरायांना अभिप्रेत होते. महात्मा गांधींना अभिप्रेत होते. आजपर्यंतचा इतिहास आहे की, ज्याज्या वेळी राम, हनुमानांसारख्या आपल्या देवता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या प्रभृतींना जातीधर्मात वाटण्याचा प्रयत्न केला आहे, तशी लेबल चिकटवण्याचा प्रयत्न झाला, त्यात्या वेळी देश दुभंगला आहे. यामुळे अशा वाचाळवीरांनी आपल्या स्वार्थासाठी मारुतीरायांना जातीधर्मात वाटण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्याने सातासमुद्रापार कीर्ती असलेल्या हिंदू धर्मास आपण कमी लेखतोय, हे त्यांनी लक्षात घ्यावे. कारण, जिथे राम आहे, तिथे हनुमान आहे. जिथे हनुमान आहे, तिथेच राम आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

शंकर गायकरगेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित होते, असे वक्तव्य केले. त्याचा वाद शमतो न् शमतो तोच रामभक्त हनुमानांना देशातील अनेक नेत्यांनी विशेषत: सत्ताधारी भाजपातील वाचाळवीरांंनी वेगवेगळ्या जातीधर्मांत वाटण्याचा प्रयत्न केला. यात भाजपाचे आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान मुस्लिम होते, असा दावा केला, तर योगी यांच्या कॅबिनेटमधील मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण यांनी हनुमान हे जाट समाजाचे होते, असा शोध लावला. यानंतर, दुसरे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी हनुमान हे खेळाडू होते, असे म्हटले आहे, तर अनुसूचित आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी हनुमान आदिवासी असून वानर हे त्यांचे गोत्र आहे, असे म्हटले आहे. ज्या हनुमानांची रामभक्त म्हणून देशविदेशांत पूजा केली जाते, गावागावांत ज्यांची मंदिरे आहेत, त्या हनुमानांविषयी अशी वाचाळ वक्तव्यं या नेत्यांनी केल्याने देशभरात हनुमानभक्तांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे हनुमान नक्की कोण होते, त्यांचे कार्य काय होते, याविषयी हनुमानभक्त आणि नाशिक येथे अंजनीपर्वतावर प.पू. शांतिगिरी महाराजांच्या मदतीने खरे हनुमान कोण होते, त्यांचे कार्य किती महान होते, याच्या इत्थंभूत माहितीचा ध्यास घेतलेले तसेच धार्मिकस्थळाबरोबरच पर्यटनस्थळ विकसित व्हावे, यासाठी झटत असलेल्या गायकर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.कोणताही स्वार्थ नसलेले विरक्त सेवेचे प्रतीक म्हणजे हनुमान. सेवा हाच ज्यांचा धर्म होता, ज्यांच्या सेवेत व्यापकता होती, शक्ती होती, पाण्यासारखा नितळपणा होता, कर्तव्यनिष्ठा होती, ती सेवा म्हणजे हनुमान होय.ज्यांना रामाला पाहायचे आहे, त्यांना हनुमानांना जाणून घेतल्याशिवाय राम भेटणार नाही. कारण, म्हणतात ना,दुनिया चले ना रामविना, राम चले ना हनुमानविना, हनुमान चले ना रामविना... असे हे राम-हनुमान यांचे अलौकिक नाते आहे.कारण, हनुमानांची रामभक्ती व्यापक होती, निरंक होती. पाण्यासारखी नितळ, स्वच्छ होती. जो रंग त्यात मिसळला, तो रंग त्यांच्या सेवावृत्तीत अन् रामभक्तीत होता. म्हणून, मारुतीरायांकडे विज्ञान, ज्ञान, बल, प्रचंड पुरुषार्थ होता. ते साहित्यिक होते. गुप्तचर होते. अष्टसिद्धी त्यांना प्राप्त होती. ते चिरंजीव आहेत. तरीही, त्यांचे राहणीमान साधे होते. म्हणूनच, ते लंगोटधारी होते. कोणताही अहंकार, गर्व त्यांच्याकडे नव्हता. म्हणूनच, अयोध्येतील ८० टक्के मंदिरांत मारुतीरायांची पूजा केली जाते. टीकाकारांनी त्यांच्या या गुणांचा प्रसार करायला हवा.सर्जिकल स्ट्राइकचे प्रणेते हनुमानआज सगळीकडे सर्जिकल स्ट्राइकचा गवगवा होता. परंतु, तो करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, सर्जिकल स्टाइकचे जनक मारुतीराय होते. समुद्रावरून उडी मारून ते लंकेत गेले. माता सीतांच्या ठावठिकाण्याविषयी कोणतीही माहिती नसताना केवळ आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर ते लंकेत गेले. माता सीतांचा शोध लावला. मात्र, ते आज्ञाधारक होते. यामुळेच सीतांच्या आज्ञेशिवाय त्यांनी अशोकवाटिकेतील एकाही फळाला हात लावला नाही. ते मॅनेजमेंट गुरूही होते. कारण, नंतर ते रावणाला भेटले. प्रभू रामचंद्रांचा निरोप दिला. नंतर, रावणाच्या मालकीच्या कापडी चिंध्या, तेलही त्याचेच, लंकाही त्याचीच. शेपटी केवळ मारुतीरायांची होती. ती रावणाने पेटवताच त्यांनी लंकादहन केले. नंतर, वेळेतच माता सीतांना भेटून ओळख म्हणून दागिना घेऊन पुन्हा प्रभू रामचंद्रांकडे पोहोचले. यात त्यांनी स्वत:च्या मालकीचे काहीही नसताना, स्वत:स कोणतीही इजा होऊ न देता खºया अर्थाने सर्जिकल स्ट्राइक केलाच. शिवाय, मॅनेजमेंट कसे असते, याचे दर्शनही घडवले. याचा प्रचार या वाचाळवीरांनी करायला हवा. उगाच त्यांना जातीधर्मात वाटू नये.

छत्रपती शिवरायांचे आदर्श मारुतीरायछत्रपती शिवरायांचे आदर्श हे मारुतीराय होते. समर्थ रामदासांनी मारुतीरायांना अभिप्रेत असे रामराज्य शिवरायांकडून स्थापन करून घेतले. हनुमानांची पूजा करून त्यांचे गुण आत्मसात करून केवळ शिवरायच नव्हे, तर संभाजी महाराजांनीही जातीधर्माचा भेदभाव न करणारे राज्य केले. समर्थ ज्यावेळी पंढरपूरला गेले, तेव्हा त्यांनी विठ्ठलाला प्रश्न केले की, हे विठ्ठला, तुझे धनुष्य कुठे आहे, शरयू कुठे आहे, तुला समाजाची चिंता नाही, मोगलांच्या जुलमी राजवटीपासून त्यांना कोण वाचवेल. नंतर, शिवराज्याचा म्हणजेच राज्यात रामराज्याचा जन्म झाला. त्या राज्यात शिवरायांकडे कोणताही स्वार्थ नव्हता. सेवाभाव होता. शिवराय पराक्रमी असूनही त्यांच्याकडे अहंकार नव्हता. तोच कित्ता पुढे संभाजी महाराजांनी गिरवला.

कारण, त्यांचा आदर्श समर्थ रामदासांनी सांगितलेले मारुतीराय होते. रावणविजयानंतर झालेल्या समारंभात सर्वांनीच हनुमानाचे कौतुक केले. नंतर, प्रभू रामचंद्रांनी सैन्यातील प्रत्येकाला काहीना काही भेटवस्तू दिली. त्यावेळी मारुतीरायांना माता सीतांनी आपली किमती माळ दिली. परंतु, मारुतीरायांनी तिचा एकेक मणी तोडून पाहिला. हे पाहून बिभीषणाने त्यांना संतापून विचारले की, हे काय करत आहात. तेव्हा मारुतीराय म्हणाले की, युद्धात मी नि:स्वार्थ भावनेने माझे काम केले. माझे कौतुक करून तुम्ही माझा व माझ्या सेवेचा अपमान करत आहात. प्रभू रामचंद्रांशिवाय मी नाही. म्हणून, मी या माळेतील मण्यांमध्ये रामसीता आहेत की नाही, ते पाहत आहे. तेव्हा, बिभीषण म्हणाले की, तुझ्यात राम आहेत का, तेव्हा मारुतीरायांनी छाती चिरून रामसीतेचे दर्शन घडवले. हेच रामराज्य आज हवे आहे. परंतु, दुर्दैवाने त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या मारुतीरायांना काही लोक जातीधर्मात वाटत आहेत. ते देशाच्या एकात्मतेला धोक्यात आणणारे आहे.

(लेखक : बजरंग दलाचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे क्षेत्रमंत्री आहेत.)(शब्दांकन : नारायण जाधव)