शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांचे ते टॅब धूळखात; ५४ लाखांचा खर्चही वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:05 IST

गेल्या टर्ममध्ये आणि अवघे चार ते पाच महिनेच नगरसेवकांच्या हाती टॅब दिसले होते. नंतर नवीन बॉडी आल्यानंतर ते पालिकेच्या दप्तरी धूळखात पडले आहेत.

ठाणे : स्मार्ट सिटीबरोबर नगरसेवकांनाही स्मार्ट बनवण्यासाठी पालिका प्रशासनाने त्यांच्या हाती टॅब दिले होते. परंतु, गेल्या टर्ममध्ये आणि अवघे चार ते पाच महिनेच नगरसेवकांच्या हाती टॅब दिसले होते. नंतर नवीन बॉडी आल्यानंतर ते पालिकेच्या दप्तरी धूळखात पडले आहेत. त्यातील अनेक टॅब बंदही असून त्यावर केलेला ५४ लाखांचा खर्चही वाया गेला आहे. शिवाय, पेपरलेस महासभा करण्याच्या पालिकेच्या धोरणाचेही बारा वाजले आहेत.त्या टॅबचा वापर आजही होऊ न शकल्याने त्यांचे करायचे काय, असा प्रश्न पालिकेला सतावू लागला आहे. २०१५ च्या मध्यंतरी ठाणे महापालिकेने महासभा आणि स्थायी समितीवर कागदांच्या माध्यमातून होणारा खर्च टाळण्यासाठी टॅबची संकल्पना पुढे आणली होती. त्यानुसार, १३५ नगरसेवकांसाठी टॅब वितरित करण्यात आले. त्यातील १२ नगरसेवकांनी ते नाकारले आहेत. ते कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षणही नगरसेवकांना दिले. सुरुवातीला नवीन म्हणून काही नगरसेविका महासभेला टॅब आणत होत्या. त्यानंतर, २०१६ मध्ये महासभेतच उशिरा गोषवारे मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर महासभेपासून टॅबवर गोषवारे उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. ते नगरसेवकांना टॅबवर पाठवलेसुद्धा होते. परंतु, अनेकांना त्याचा वापरच करता न आल्याने पालिकेला नाइलाजास्तव पुन्हा हातातच गोषवारे द्यावे लागले. २०१७ मध्ये ठामपाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्व नगरसेवकांकडील टॅब पालिकेने जमा करून घेतले.पालिकेचा प्रयोग अपयशीदोन वर्षे उलटूनही नगरसेवकांच्या हाती पुन्हा टॅब आलेले नाहीत. सध्या ते पालिकेत धूळखात पडून असून यातील अनेक टॅब बंद झाले असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. एकूणच नगरसेवकांना स्मार्ट करण्याचा पालिकेचा प्रयोग सपशेल अपयशी ठरला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका