शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांचा निधी गरीबांसाठी खर्च करावा - जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 17:07 IST

कोरोनामध्ये लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब नागरीकांना मदत मिळावी या उद्देशाने जाग या संस्थेच्या वतीने महापौरांना पत्र दिले असून नगरसेवकांचा नगरसेवक निधी या नागरीकांसाठी खर्ची करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

ठाणे : कोरोनाच्या संसर्गाने संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉक डाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होत आहे. ठाणे, मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रु ग्ण आढळून आल्याने राज्याला मोठ्या आर्थिक निधीची गरज आहे. त्यामुळे ठाणे महानगर पालिकेतील सर्व नगरसेवकांचा निधी पालिकेकडे वर्ग करावा आणि त्यामधून गरजू गरीब लोकांसाठी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करावा अशी मागणी जाग संस्थेने केली आहे.                 गोरगरीब कामगार वर्गाकडे सध्या कोणतीही कमाई नसल्याने तो वर्ग हवालिदल झालेला आहे. बहुतेक गरिबांकडे असलेले अन्नधान्य, पैसे संपले आहेत. त्यामुळे त्यांना दोन वेळचे जेवण देखील मिळेनासे झाले आहे. काही प्रमाणात सामाजिक संस्थांकडून गरिबांना जेवण पुरविले जाते आहे. परंतु त्यांच्याकडे आता आर्थिक टंचाई निर्माण होऊ लागली असल्याने पुढील काही दिवसांत गरीबांच्या उपासमारीमध्ये मोठी वाढ होणार आहे. राज्यात कोरोनाची आणीबाणी निर्माण झाल्याने राज्याला जास्त निधीची गरज आहे. राज्यातून रोजगारासाठी स्थलांतरित झालेला मोठा मजूर वर्ग ठाण्यात आहे. त्यांनाही मदतीची गरज आहे. त्यामुळे किमान ठाणे महानगर पालिकेने तरी सगळ्याच मदतीसाठी राज्यावर अवलंबून न राहता इथल्या गरीब, गरजूंना अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करण्यासाठी सर्व नगरसेवकांचा विकास निधी ठाणे महापालिका प्रशासनाकडे वर्ग करावा.अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेता ठाणे महापालिकेच्या सर्व नगरसेवकांचा प्रत्येकी १० लाख रु पयांचा नगरसेवकनिधी महापालिकेस वर्ग करावा. ठाणे महानगर पालिकेत १३० नगरसेवकांची संख्या आहे. त्यासाठी लागणारी स्थायी समितीची मंजुरी घेऊन तसा ठराव राज्यशासनाकडे त्वरीत मंजुरीसाठी पाठवावा अशी मागणी जाग संस्थेचे संजय मंगो, जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, प्रदीप इंदुलकर, मिलिंद गायकवाड, अजय भोसले यांनी महापौर नरेश म्हस्के, पालिका आयुक्त आणि पालकमत्र्यांकडे केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका