शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शीळफाटा उड्डाणपुलांचा खर्च सव्वाशे कोटींनी वाढला; दोन उड्डाणपुलांसह भुयारीमार्ग बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 02:43 IST

प्रकल्पाचा एकूण खर्च ४१० कोटींवर

नारायण जाधव

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील अत्यंत गजबजलेल्या जंक्शनपैकी एक असलेल्या शीळ-कल्याणफाटा येथील प्रस्तावित दोन उड्डाणपूल आणि भुयारीमार्गाच्या खर्चात तब्बल सव्वाशे कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

या परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे या प्रकल्पाच्या आराखड्यात बदल करावा लागल्याने हे काम लांबणीवर पडलेले असतानाच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे त्यात पुन्हा बदल करावा लागला. या उच्चदाब वीजवाहिन्याही हटवाव्या लागणार आहेत. यामुळे या प्रकल्पांचा पूर्वीच्या सुधारित २८६ कोटींचा खर्च आता ४१० कोटी एक लाख ९४ हजारांवर गेला आहे. या वाढीव खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यताही एमएमआरडीएने नुकतीच दिली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -४ वरील शीळफाटा, कल्याणफाटा, महापे जंक्शन तसेच कल्याण-बदलापूर पाइपलाइन रोड या परिसरातील वाहतुकीत अलीकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे. त्यातच, जेएनपीटी बंदरातून मुंबई-अहमदाबाद, नाशिक कडे जाणारी कंटेनरची अवजड वाहतूक या परिसरातून येजा करते. गेल्या काही वर्षांत ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह पनवेल या महानगरांचा विस्तार झपाट्याने झाला आहे.

या परिसरात काही खासगी विकासकांच्या टाउनशिपही येऊ घातल्या आहेत. यामुळे शीळफाटा परिसरात उड्डाणपूल बांधण्याचे एमएमआरडीएने प्रस्तावित केले होते. त्यासाठी स्टुप कन्सल्टंट यांच्याकडून सविस्तर अहवाल तयार केला होता. या अहवालात सध्याच्या ३० मीटर रुंदीच्या रस्त्याचे ६० मीटर रुंदीकरण करणे, शीळफाटा आणि कल्याणफाटा येथे उड्डाणपूल प्रस्तावित केले होते. त्यासाठी २८६ कोटींच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यताही एमएमआरडीएने दिली होती. त्यानंतर, कामास सुरुवात करून आॅगस्ट २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार, ठेकेदारास एमएमआरडीएने ६६ कोटी ५९ रुपये अदाही केले आहेत. गेल्या काही वर्षांत ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह पनवेल या महानगरांचा विस्तार झपाट्याने झाला आहे.असा होणार खर्चअशातच बुलेट ट्रेनचा प्रकल्प आला. ही बुलेट ट्रेन दत्त मंदिराच्या जवळून पहिल्या स्तरावरून जमिनीखालून जात आहे. यामुळे हा आराखडा पुन्हा बदलण्याचे ठरले. त्यानुसार, नव्या आराखड्यानुसार आता १०५ कोटी ४३ लाख खर्चून या परिसरातील उच्चदाब वीजवाहिन्या आणि ३.५ किमी लांबीची एमआयडीसीची पाइपलाइन स्थलांतरित करावी लागणार आहे. याशिवाय, ४९ कोटी खर्चून शीळफाटा येथे ३+३ मार्गिकांचा उड्डाणपूल बांधणे, ९८.७८ कोटींचा कल्याणफाटा येथे २+२ मार्गिकांचा उड्डाणपूल बांधणे तसेच ५८.६६ कोटींचा कल्याणफाटा जंक्शन येथे ३+३ मार्गिकांचा भुयारीमार्ग बांधण्याचे प्रस्तावित केल्यामुळे हा खर्च वाढला आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी