शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

कचरा खाजगीकरणात भ्रष्टाचार; सभागृह नेत्यांनी वाचला पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:00 IST

उपायुक्तांना कार्यमुक्त करण्याची मागणी

कल्याण : केडीएमसीने चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्यासाठी १०७ कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट दिले आहे. मात्र, कंत्राटदार महापालिका अधिकाऱ्यांच्या साथीने महापालिकेलाच लुटत आहे, असा आरोप सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी गुरुवारी महासभेत केला. याप्रकरणी सविस्तर माहितीचा अहवाल पुढील महासभेत सादर करावा, त्याची सविस्तर चौकशी करून कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे, महापालिकेची आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी समेळ यांनी केली आहे.राज्य सरकारकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त धनाजी तोरसकर हे तीन वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन विभागात काम पाहत आहेत. परंतु, त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती नसते. त्यांच्याकडे माहिती मागितली तर ते देत नाहीत. महापालिकेचा एकही घनकचरा प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात राबवला गेलेला नाही. सगळे प्रकल्प अडचणीत आले आहे. तसेच कचरागाड्यांवर काम करणाºया कामगारांचे पगार थकवले आहेत. कंत्राटदाराचे बिल लेखा विभागाकडे वेळेत सादर केलेले नाही. त्यामुळे तोरसकर यांची कार्यक्षमता उघडी पडली आहे. तोरसकर यांची वर्षभरापूर्वी गडचिरोलीला बदली झाली आहे. मात्र, ते तेथे रुजू झाले नाहीत. कारण, त्यांना येथे कचºयातून मलिदा खाण्यात स्वारस्य आहे. त्यांच्यानंतर चांगले काम करणारे लेखापरीक्षक दिनेश थोरात यांची बदली झाली. प्रशासनाने त्यांना तातडीने कार्यमुक्त केले. मात्र, तोरसकर यांना कार्यमुक्त केले जात नाही. त्यामुळे त्यांना तातडीने कार्यमुक्त करावे. त्यांचे काय करायचे ते सरकार बघेल, असा मुद्दा समेळ यांनी उपस्थित केला.महापालिकेने कचरा गोळा करण्यासाठी १० पैकी चार प्रभाग क्षेत्रांत कंत्राटदार नेमला आहे. यापूर्वी महापालिकेचा कंत्राटदार एका डम्परचे आठ तासांसाठी तीन हजार २५० रुपये आकारत होता. आता नवा कंत्राटदार प्रतिटनाच्या एका फेरीसाठी जो दर आकारत आहे, त्यावरून त्याचे बिल दिवसाला १८ हजार रुपये एका डम्परचे होणार आहे. हा दर मागच्या दराच्या तुलनेत सहापटीने जास्त आहे. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. त्यामुळे त्याची चौकशी करावी, असे ते म्हणाले. मनसे गटनेते मंदार हळबे म्हणाले, कंत्राटी वाहनचालकांचे पगार देण्यात तोरसकरांनी हलगर्जी केली आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांचे पगार थकलेले आहेत. त्याची माहितीही तोरसकर यांनी दिलेली नाही.‘तो’ प्रकार चुकून झाल्याची कबुलीकचरागाडीवरील वाहनचालकांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावात चार कर्मचारी हे सतत गैरहजर व एक मृत असल्याचे नमूद केले होते. प्रत्यक्षात चारही कर्मचारी कामावर असताना त्यांना गैरहजर दाखवून त्यांच्यावर अन्याय केला असल्याची बाब हळबे यांनी उघड केली.या मुद्यावर त्यांनी सहायक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांना चांगले फैलावर घेतले. त्यावेळी जोशी यांची बोबडीच वळली. त्यांनी हा प्रकार चुकून झाला असल्याची कबुली सभेत दिली. दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न हळबे यांनी प्रशासनास विचारला असता प्रशासनाकडून त्यावर मौन बाळगण्यात आले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCorruptionभ्रष्टाचार