शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी मनपाच्या कर वसुली विभागातील भ्रष्टाचार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 17:22 IST

Bhiwandi News : भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेची कर वसुली योग्य रीतीने होत नसल्याने महापालिकेचा आर्थिक डोलारा कमकुवत झाला आहे.

- नितिन पंडीत

भिवंडी -  भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेची कर वसुली योग्य रीतीने होत नसल्याने महापालिकेचा आर्थिक डोलारा कमकुवत झाला आहे. प्रशासनाच्या वतीने शहरातील नागरिक कर वेळेवर भरत नसल्याची ओरड नेहमी होत असते. तर मनपाच्या कर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीने कर वसुली होत नसल्याचा आरोप शहरातील कर भरणारे व सुज्ञ नागरिक वेळोवेळी करत आहेत.मनपाची कर वसुली व्यवस्थित होत नसल्याने मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कर वसुली विभागातील सुमारे ९७ हुन अधिक कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन देखील रोखून ठेवले होते. त्यावेळी नागरिक कर भरत नाही किंवा वासुलीसाठीची बिल वेळेवर मिळत नसल्याचा निर्वाळा वसुली कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला होता. मात्र कर वसुली विभागातील भ्रष्ट कारभार सोमवारी समोर आला आहे. त्यामुळे कर वसुली विभागात एकच खळबळ उडाली आहे. घरपट्टी पत्नीच्या नावे करण्यासाठी मनपाच्या प्रभाग समिती पाच मध्ये असलेले प्रभारी लिपिक महेंद्र मोहिते याने एका इसमाकडून २४ हजार रुपयांची लाच मागितली होती . हि लाच स्वीकारतांना मोहिते यास ठाणे लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात अटक केली असून या कारवाईने भिवंडी मनपाच्या कर वसुली विभागातील भ्रष्टाचार उघड झाला असून मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया आता कर वसुली विभागात वाढलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी नेमकी काय उपाय योजना राबवितात याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे