शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये शूटींग रेन्जचे भूमीपुजन करताना पालकमंत्र्यांनी साधला अचुक निशाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 19:05 IST

अंबरनाथ विम्को नाका पसिरात अंबरनाथ पालिकेचे शुटींग रेंज होते. मात्र या शूटींग रेंज 1998 पासुन बंद अवस्थेते होते. या शूटींग रेंजचे वापर होत नसल्याने ही जागा पडीक अवस्थेत गेली होती. या ठिकाणी शुटींग रेंज पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपडीक अवस्थेत असलेल्या अंबरनाथमधील शूटींग रेंज पुन्हा सुरु होणार अंबरनाथमधील शूटींग रेंज 1998 पासुन बंद अवस्थेते होतेअंबरनाथमधील शूटींग रेंजचे 10 महिन्यात ते काम पूर्ण  होईल

अंबरनाथ - गेली कित्तेक वर्ष पडीक अवस्थेत असलेल्या अंबरनाथमधील शूटींग रेंज पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न्न पालिकेने सुरु केले आहे. या शूटींग रेंजचे भूमीपुजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रायफलचा वापर करुन पालकमंत्र्यांनी अजुन निशाना साधला. सलग दोन वेळा अचूक निशाना साधत या शूटींग रेंजचे भूमीपुजन झाल्याचे जाहिर केले.     अंबरनाथ विम्को नाका पसिरात अंबरनाथ पालिकेचे शुटींग रेंज होते. मात्र या शूटींग रेंजचे 1998 पासुन बंद अवस्थेते होते. या शूटींग रेंजचे वापर होत नसल्याने ही जागा पडीक अवस्थेत गेली होती. या ठिकाणी शुटींग रेंज पुन्हा सुरु करण्यासाठी सुचिता देसाई यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर पालिकेने सव्वा कोटींचा प्रकल्प आराखडा तयार करीत या कामाला मंजुरी दिली. या शूटींग रेंजच्या जागेची स्वच्छता करुन त्या ठिकाणी नव्याने शूटींग रेंज सुरु करण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपुजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंबरनाथमधील राजकीय पुढारी विकास कामांसाठी एकत्रित कसे येतात हे चित्र पाहण्यासाठी इतर राजकारण्यांनी अंबरनाथमध्ये यावे. विकासाच्या मुद्यावर अंबरनाथकर एकत्रित येतात ही चांगली बाब आहे. या पुढे देखील वेगाने शहरातील प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. अंबरनाथ शहरात जे उपक्रम सुरु आहेत त्या उपक्रमांमुळे अंबरनाथ शहर हे जिल्ह्यातील महत्वाचे शहर म्हणून पुढे येत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार शिंदे यांच्या पुढकारातुन हा प्रकल्प मुर्त स्वरुप घेत असुन येत्या 10 महिन्यात ते काम पूर्ण  होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शूटींग रेंजसोबत नेताजी मैदानाचेही भूमीपुजन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या मैदानाचे सपाटीकरन करुन लवकरच त्या मैदानाचेही काम सुरु करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.    शूटींग रेंजच्या भूमीपुजनाच्या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हातात रायफल घेतली. समोरील अचुक निशाना साधत पालकमंत्र्यांनी देखील शूटींगचा अनुभव घेतला. पालककमंत्र्यांचा निशाना अचुक लागताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील हातात रायफल घेत अचुक निशाना साधत शूटींचा आनंद घेतला. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, अब्दुल शेख, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ बालाजी किणीकर, प्रदिप पाटील, सदाशिव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

 

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथSportsक्रीडा