शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाच्या सभेला गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांना प्रभाग सुधारणा निधी नाही, महापौरांचा विरोधकांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 14:33 IST

विरोधकांनी जरी बजेटच्या महासभेबाबत आक्षेप घेतले असले तरी देखील ही महासभा लावली जाईल असे स्पष्ट मत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. परंतु जे नगरसेवक या सभेला गैरहजर राहतील त्यांना प्रभाग सुधारणा निधी दिला जाणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसभा लावण्यास प्रशासन अनुकुलमहापौरांनी घेतला आक्रमक पावित्रा

ठाणे - नियमानुसार राष्ट्रगीत झाल्याने बजेटवरील महासभा संपली असल्याने यापुढे महासभा लावल्यास ती बेकायदेशीर ठरेल असा पावित्रा घेत लोकशाही आघाडीने या महासभेलाच गैरहजर राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु त्यांच्या वक्तव्याची हवा अवघ्या एका दिवसातच निघाली असून जो नगरसेवक बजेटच्या महासभेला गैरहजर राहिल त्याला प्रभाग सुधारणा निधी दिला जाणार असल्याचा पावित्रा आता महापौरांनी घेतला आहे. तसेच प्रशासन देखील ही महासभा लावण्यास अनुकुल झाल्याने विरोधकांची रस्त्यावर उतण्याची हवाच निघाली आहे.            ठाणे महानगर पालिका आयुक्तांनी १९ मार्च रोजी अंदाजपत्रक मांडले आहे. हे अंदाजपत्रक विनाचर्चा मंजूर झालेले असतानाही सत्ताधारी पक्षाकडून नव्याने महासभा बोलावण्याची तयारी सुरु झाली आहे. या पाशर््वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ३८ नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अंदाजपत्रकाला पाठिंबा जाहीर केला असला तरी देखील त्या सभेमध्ये आयुक्तांच्या विश्लेषणानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यामुळे ही सभा संपली असल्याचा मुद्दा उपस्थित करुन यापुढे जर महासभा लावली तर ती बेकायदेशीर ठरणार असून, त्या सभेला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट मत लोकशाही आघाडीने व्यक्त केले होते. तसेच नगरसेवकांच्या प्रभागामध्ये असलेल्या नागरी कामांच्यासाठी आयुक्तांनी निधी द्यावा, अशी मागणी देखील एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.            दरम्यान विरोधकांनी घेतलेल्या भुमिकेची अवघ्या एकाच दिवसात महापौरांनी हवा काढली आहे. नियमानुसार बजेटची महासभा घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु या महासभेत जे नगरसेवक गैरहजर राहतील त्यांना प्रभाग सुधारणा निधी दिला जाणार नसल्याची स्पष्ट भुमिका देखील त्यांनी घेतली आहे. शिवाय विरोधकांनी केलेल्या सुचनांचा अंतर्भाव करायचा की नाही, याबाबतचाही निर्णय देखील मी घेईन असे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महासभेला हजर राहायचे की गैरहजर हा विचार विरोधकांनीच करावा असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. दुसरीकडे या बाबत प्रशासनाने देखील राष्ट्रगीत झाले म्हणजे महासभा संपली असा त्याचा अर्थ होत नसल्याचे स्पष्ट करीत मागील कित्येक वर्षापासून तसा पायंडा पडला आहे. त्यामुळे बजेटची महासभा घेता येऊ शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय महासभा चालविण्यासाठी ३७ टक्के कोरम अपेक्षित असतो, तो कोरम होणार असल्याने बजेटची महासभा आता केव्हाही लावली जाऊ शकते असा निर्णय देखील घेण्यात आला आहे.सभा कायदेशीर असेल तर सहभागी होऊ... विरोधकांनी घेतली मवाळ भुमिकाचौकट - विरोधकांनी टोकाची भुमिका सोडली नाही तर त्यांच्याकडील विकास निधी देखील महासभेत चर्चेच्या अनुषांगाने आमच्या विभागात वळवू असा पावित्रा देखील सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे विरोधकांची तलवार आता जवळ जवळ म्यान झाली असून सभा कायदेशीर असेल तर आम्ही सहभागी होऊ अशी काहीशी भुमिका लोकशाही आघाडीने घेतल्याची माहिती आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाBudgetअर्थसंकल्प