शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

तीन अपत्य असलेल्या महिलेचे नगरसेवकपद धोक्यात, माहेरच्या नावाने बनली नगरसेविका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 16:14 IST

तीन अपत्य असलेल्या महिलेने नगरसेविका होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आपल्या माहेरील पुरावे सादर करून निवडणूकीत निवडून आली. याबाबत निवडणूक विभागाकडे माजी नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत त्यांनी आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

भिवंडी : तीन अपत्य असलेल्या महिलेने नगरसेविका होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आपल्या माहेरील पुरावे सादर करून निवडणूकीत निवडून आली. याबाबत निवडणूक विभागाकडे माजी नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत त्यांनी आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत.महानगरपालिकेच्या मे २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील गौरीपाडा खजूरपुरा या परिसरांतील प्रभाग क्र.७ अ मधून साजीदाबानो इश्तियाक मोमीन या निवडून आल्या आहेत. हे त्यांचे माहेरचे नांव आहे. म्हणून त्यांचा आपत्यांचा उल्लेख झालेला नाही. या पुर्वी याच महिलेने सन २०१२च्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत याच परिसरांतील वार्डातून आपल्या पतीच्या नावे म्हणजे अन्सारी साजीदा रईस या नावाने नामनिर्देशनपत्र भरले होते. मात्र त्यांना दोन पेक्षा जास्त मुले असल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्र बाद झाले होते.असे असताना त्यांनी २०१७ मध्ये आपल्या वडिलांचे नाव लावून माहेरच्या नावाने नामनिर्देशन अर्ज भरला आणि स्वत:ची माहिती लपवून निवडणूक विभागाची फसवणूक केली, असा आरोप माजी नगरसेवक अनिस खलील मोमीन यांनी केला. तसेच या बाबतची सर्व पुरव्याची कागदपत्रे देऊन अनिस मोमीन यांनी नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी निवडणूक विभाग व पालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी अ.गो.जाधव यांनी नामनिर्देशना सोबत उमेदवाराने द्यावयाच्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्यास त्याची चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश पालिका आयुक्त योगेश म्हसे यांना दिले. या बाबत पालिका आयुक्त म्हसे यांनी ३ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेतली असून येत्या दोन दिवसांत दुसरी सुनावणी आयुक्त घेणार आहे. त्यामुळे साजेदाबाने इश्तियाक मोमीन यांच्या नगरसेविका पदावर टांगती तलवार आहे. दोन दिवसांपुर्वी काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद अरशद मोहम्मद असलम अंन्सारी यांचा जातीचा दाखल जातपडताळणी विभागाने रद्द केल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याच्या मार्गावर आहे. आता साजीदाबानो इश्तियाक मोमीन यांच्या बाबत आयुक्त काय निर्णय जाहिर करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :thaneठाणे