शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जोगिला मार्केटवरील १८६ बांधकामांवर पालिकेचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:03 IST

जोगिला तलावात भरणा टाकून त्याठिकाणी झालेली बांधकामे हटवण्याची कारवाई अखेर गुरुवारपासून सुरू झाली. बाधितांनी त्याच ठिकाणी पुनर्वसनाची मागणी होती

ठाणे : जोगिला तलावात भरणा टाकून त्याठिकाणी झालेली बांधकामे हटवण्याची कारवाई अखेर गुरुवारपासून सुरू झाली. बाधितांनी त्याच ठिकाणी पुनर्वसनाची मागणी होती. परंतु, ती विचारात न घेता पालिकेने ३०० पोलिसांच्या बंदोबस्तात पहिल्या दिवशी १८६ बांधकामांवर हातोडा टाकला. यावेळी स्थानिकांनी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट घेऊन कारवाई थांबवण्याचे आवाहन केले होते.मागील दोन वर्षांपासून ठाणे महापालिकेने शहरातील अनेक रस्ते अतिक्रमणमुक्त केले आहेत. त्यानंतर, गेले काही महिने थांबलेली कारवाई आता पुन्हा नव्याने सुरू केली आहे. तिला प्रथमच स्थानिकांनी विरोध करून ४८ तासांचा अल्टीमेटम देऊन त्याच ठिकाणी पुनर्वसनाची मागणी केली होती. परंतु, असे असतानादेखील गुरुवारपासून पालिकेने कारवाईला पुन्हा सुरुवात केली. त्यानुसार, उथळसर भागातील जोगिला मार्केट येथील तलाव बुजवून त्याठिकाणी झालेल्या बांधकामांवर हातोडा मारला.यावेळी सुरुवातीला रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. परंतु, पोलीस बंदोबस्तात पालिकेने ही कारवाई केली. त्यानंतर, तिला स्थगिती मिळावी म्हणून न्यायालयातदेखील धाव घेतली. परंतु, तोपर्यंत पालिकेने रहिवाशांची घरे खाली करून त्यांच्यावर बुलडोझर फिरवला.दरम्यान, या रहिवाशांचे तात्पुरत्या स्वरूपात खेवरा सर्कल येथील रेंटलच्या नव्या इमारतीत पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यानंतर, दोन महिन्यांत त्यांना हक्काचे घर दिले जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे तोपर्यंत त्यांच्याकडून रेंटलच्या घरांचे कोणत्याही स्वरूपात भाडे घेतले जाणार नसल्याची ग्वाही अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. तरीदेखील निवारा हक्क समन्वय समितीने ही कारवाई टाळण्यासाठी चव्हाण यांच्याकडे विनंती केली. परंतु, तरीही कारवाई सुरूच होती. आता राहत आहोत, त्यापेक्षा चांगले घर मिळणार म्हणून आणि हक्काचे घर जातेय म्हणून काही रहिवाशांच्या डोळ्यांत अश्रूू तर काहींच्या डोळ्यांत हसू दिसत होते. भरउन्हातच ही कारवाई होत असल्याने अनेकांचे संसार एका क्षणात उघड्यावर आले.