शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पॉझिटिव्ह पतीच्या उपचारासाठी महिलेची आठ दिवस वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 00:52 IST

डोंबिवलीतील घटना : अखेर खाजगी रुग्णालयात केले दाखल

कल्याण : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली-पी अ‍ॅण्ड टी कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेच्या पतीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, त्यांना केडीएमसीकडून सहकार्य मिळत नसल्याने गरिबांनी उपचारासाठी जायचे कुठे, असा संतप्त सवाल तिने केला आहे. सध्या तिच्या पतीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठ दिवसांपासून उपचारासाठी वणवण करावी लागत असल्याची व्यथा तिने मांडली आहे.महिलेचे पती रिक्षाचालक आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत तिच्या पतीला आठ दिवसांपूर्वी त्रास जाणवू लागला. त्यांनी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला असता त्यांनी कोरोनाची लक्षणे असल्याचे सूचित केले. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या कुटुंबाने मनपा प्रशासनाकडे मदत मागत महिला व मुलाला क्वारंटाइन करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही.शास्त्रीनगर कोविड रुग्णालयात बेड कमी आहेत. तेथे उपचारासाठी दाखल केले, तरी योग्य काळजी घेतली जाईल की नाही, याची हमी देता येत नाही, असे त्यांना एका डॉक्टरनेच सांगितले. अखेरीस या महिलेच्या पतीने स्वत:च रिक्षा चालवून कल्याण पूर्वेतील मलंग रोडवरील एक खाजगी रुग्णालय गाठले. तेथे त्यांना दाखल करण्यात आले. आमदार गणपत गायकवाड त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी महिलेची व्यथा ऐकल्यावर केडीएमसी प्रशासनावर निशाणा साधला आहे. लक्षणे आढळल्यास त्या रुग्णाला तातडीने क्वारंटाइन केले पाहिजे. त्याची चाचणी करून उपचार सुरू केले पाहिजेत. मात्र, रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांना आठ दिवस वणवण करावी लागली. रुग्णांची वणवण थांबवली नाही, तर कोरोना वाढण्याची भीती आहे. या कारभाराला मनपा जबाबदार आहे, असे ते म्हणाले.महिलेच्या पतीच्या चाचणीकरिता दोन हजार ७०० रुपये शुल्क घेतले गेले. वास्तविक पाहता सामान्यांसाठी चाचणी मोफत करायची आहे. समजा, शुल्क घेतलेच तर दोन हजार २०० रुपये घ्यायचे आहेत. पाचशे रुपये जादा कशाच्या आधारे घेतले. सामान्यांसाठी उपचारासाठी बेड उपलब्ध करून दिले जात नसतील, तर त्यांनी जायचे कुठे? आधीच लॉकडाऊनमुळे सामान्य माणूस कामधंदा नसल्याने कंगाल झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.महानगरपालिका करणार प्रकाराची शहानिशायासंदर्भात केडीएमसीच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता याविषयी शहानिशा केली जाईल. महापालिकेकडून तरी अशा प्रकारची रुग्णांची हेळसांड केली जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या