शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केंद्रांवर गर्दी नसताना खाजगी रुग्णालयांना शुल्क देण्याच्या निर्णयावर टीकेची झोड; पालिकेचे घुमजाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 19:07 IST

१०० रुपये देण्याचा निर्णय रद्द करत रुग्णालयांना लसीसह सिरिंज पालिका मोफत देणार आहे . 

ठळक मुद्दे१०० रुपये देण्याचा निर्णय रद्द करत रुग्णालयांना लसीासह सिरिंज पालिका मोफत देणार आहे . 

मीरा रोड : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर गर्दी ओसरली असताना खाजगी लसीकरण केंद्रांना परवानगी देऊन प्रत्येक नागरिकांसाठी १०० रुपये देण्याच्या निर्णयावर टीकेची झोड उठताच  पालिकेने घुमजाव आहे. १०० रुपये देण्याचा निर्णय रद्द करत रुग्णालयांना लसीसह सिरिंज पालिका मोफत देणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेची शहरात लसीकरण केंद्र सुरू आहेत. या लसीकरण केंद्रांवर ४५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे.  सदर केंद्रांवर नागरिकांची गर्दी ओसरली असल्याचे चित्र आहे. लसीकरण केंद्रांवर नागरिकांना पूर्वीसारखे तासन तास ताटकळत रहावे लागत नाही. तसे असताना मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील खाजगी १९ रुग्णालयांना ४५ व त्यावरील वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी प्रति नागरिक १०० रुपये देण्याचा निर्णय  घेतला होता . 

वास्तविक यातील अनेक खाजगी रुग्णायातील लसीकरण केंद्रांना पूर्वी सुद्धा परवानगी दिली होती. पण लस नसल्याने ती बंद केली गेली. आता पुन्हा १९ खाजगी लसीकरण केंद्रांना परवानगी दिली आहे. त्यांना महापालिकाच शासनाकडून मोफत आलेली लस पुरवत आहे. पालिका लस पुरवत असल्याने सेवाशुल्क म्हणून शंभर रुपये प्रति लस देण्यामागे खाजगी रुग्णालयास दिले जाणार होते. परंतु त्यावरून पालिका व सत्ताधारी भाजपा वर टीकेची झोड उठली. कारण महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर गर्दी नसताना तसेच ४५ व त्यावरील वयोगटातील नागरिकांची गैरसोय पूर्वी सारखी होत नाही . निर्णयावर आक्षेप

राजकीय श्रेयासाठी खोटा बनाव करून खाजगी रुग्णालयांना आर्थिक फायदा करून देण्यासाठी सत्ताधारी भाजप व महापालिकेने हा गैरनिर्णय घेतल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे सुखदेव बिनन्सी यांनी केला होता. तर पालिकेने मंजुरी दिलेल्या १९ खाजगी रुग्णालय लसीकरण केंद्रांपैकी काही पूर्वीदेखील सुरू होती. परंतु नंतर ती बंद करण्यात आली. सदर खाजगी लसीकरण केंद्र ही केंद्र शासना कडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून दिल्यावर गरजेनुसार सुरू करण्याचा विचार करायला हवा अशी भूमिका माजी विरोधी पक्षनेते राजू भोईर यांनी मांडली होती. प्रश्न उपस्थितदुसरीकडे महापौरांना डावलून भाजपाच्या एका स्थानिक वादग्रस्त नेत्याला लसीकरण केंद्र सुरु केल्याचे श्रेय देण्याचा खटाटोप झाला . त्यातच केंद्रांवर गर्दी नसताना खाजगी रुग्णालयांना प्रति नागरिक १०० रुपये कशाला?, असे सवाल होऊन पालिका व सत्ताधारी भाजपा वर टीका होऊ लागली. अखेर आयुक्त दिलीप ढोले यांनी खाजगी रुग्णालयांच्या सोबतच्या सामंजस्य करारातील १०० रुपये प्रति व्यक्ती सेवाशुल्क देण्याची आत काढून टाकली. तसेच मोफत लसीसह सिरिंज पालिका देणार असल्याचे स्पष्ट केले. शिवाय प्रशस्तिपत्रक खाजगी लसीकरण केंद्रास दिले जाणार आहे असे सूत्रांनी सांगितले.  खाजगी रुग्णालयांना त्यांचे कमर्चारी घेऊन मोफत लसीकरण करावे लागणार आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMira Bhayanderमीरा-भाईंदरhospitalहॉस्पिटल