शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: महिलांना ऊठबशा काढायला लावणे पोलीस अधिकाऱ्याला भोवले; तडकाफडकी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 03:51 IST

महिलांच्या शिक्षेची चित्रफीत बनवून ती सोशल मीडियावर प्रसारित करणे, एका पोलीस अधिकाºयाला चांगलेच भोवले आहे.

पालघर : लॉकडाउनदरम्यान कारवाई करताना पोलिसांनी नागरिकांना ऊठबशा काढण्याच्या शिक्षा करू नयेत, या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि महिलांच्या शिक्षेची चित्रफीत बनवून ती सोशल मीडियावर प्रसारित करणे, एका पोलीस अधिकाºयाला चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांची जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.सहायक पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी सातपाटी खाडीत शिंपल्या पकडण्यासाठी गेलेल्या गरीब मच्छीमार महिला व पुरुषांना खाडीच्या पाण्यातून बाहेर बोलावत ऊठबशा काढण्याची शिक्षा सुनावली होती. सर्वच स्तरांवरून दबाव वाढून कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. यामुळे पोलीस अधीक्षकांनी सावंत यांची बदली केली. या घटनेची चित्रफीत सोशल मीडियावरून प्रसारित करणाºया व्यक्तीचा शोध पोलीस घेत असून त्याच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक हे करीत आहेत. तक्रारी आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून याप्रकरणी कारवाई केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिसpalgharपालघर