शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कल्याण-डोंबिवलीकरांसाठी कोव्हिड-१९ तपासणीसाठी स्वतंत्र लॅब होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 16:24 IST

डोंबिवली – करोना अर्थात कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असतानाच करोनाची तपासणी अधिकाधिक संख्येने ...

ठळक मुद्देडॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मंजुरीकरोना तपासणी लॅबची संख्या सध्या मर्यादित असून उपलब्ध लॅब्जवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे.

डोंबिवली – करोना अर्थात कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असतानाच करोनाची तपासणी अधिकाधिक संख्येने व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीसाठी स्वतंत्र तपासणी लॅब असावी, यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला यश आले असून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी करोना तपासणीची स्वतंत्र लॅब उभारण्यासाठी निधी देण्यास मंजुरी दिली आहे.करोना तपासणी लॅबची संख्या सध्या मर्यादित असून उपलब्ध लॅब्जवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. कल्याण-डोंबिवलीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून इथे स्थानिक पातळीवर लॅब असणे आवश्यक आहे. सध्या संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबई येथील केईएम रुग्णालय आणि जेजे रुग्णालयात पाठवावे लागत असून त्याचा अहवाल येण्यास वेळ लागत असल्यामुळे उपचारांमध्ये अडचणी येत आहेत.त्यामुळेच कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत करोना तपासणीची स्वतंत्र लॅब असावी, यासाठी खा. डॉ. शिंदे प्रयत्नशील होते. अशा प्रकारच्या लॅबसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन योजनेतून देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली होती. ही मागणी श्री. नार्वेकर यांनी मान्य केली असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने आता सदर लॅबचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली