शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
3
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
4
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
5
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
6
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
7
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
8
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
9
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
10
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
11
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
12
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
13
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
14
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
15
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
16
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
17
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
18
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
19
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
20
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Thane Updates: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांची संख्या माेठी; १८ टक्क्यांच्या आसपास तरुण बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 23:36 IST

मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रकोप ठाण्यात सुरू झाला. मधल्या काळात रुग्णवाढीचा दर काहीसा कमी झाला होता

अजित मांडकेठाणे :  ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरू लागली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दिवसाला नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणदेखील टार्गेट होत आहेत. त्यामुळे ठाणेकरांच्या चिंतेत अधिक वाढ होत आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रकोप ठाण्यात सुरू झाला. मधल्या काळात रुग्णवाढीचा दर काहीसा कमी झाला होता. परंतु फेब्रुवारी अखेरपासून पुन्हा रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यापूर्वी कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना होता. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांचीच संख्या जास्त होती. याशिवाय मृत्यूचे प्रमाणदेखील त्यांचेच जास्त होते. परंतु आता तरुण रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आता कामानिमित्ताने किंवा इतर कारणांमुळे तरुण मंडळी घराबाहेर पडू लागली आहेत. त्यामुळे त्यांचा आकडा वाढत आहे.

याशिवाय ते ज्येष्ठांपेक्षा सजग असल्याने थोडा त्रास जाणवला तरीदेखील चाचणी करतात. त्यामुळेही तरुण रुग्ण वाढताना दिसत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. बहुसंख्य तरुणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, आतापर्यंत ठाणे महापालिका हद्दीत ७१ हजार १० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातील ६३ हजार १३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १४३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, ५४९९ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. पहिल्या लाटेत ६० वयोगटापुढील रुग्णांचे प्रमाण १८  टक्क्यांच्या आसपास, तर ५१ ते ६० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण १७.३ टक्के होते. याच कालावधीत तरुणांचे प्रमाण हे १५.८ टक्के होते. आता दुसऱ्या लाटेत हे प्रमाण उलट होताना दिसत आहे. कोरोनाबाधित तरुण रुग्णांचे प्रमाण हे १८ टक्क्यांच्या आसपास पोहोचले असून, ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. 

कोणत्या वयोगटाचे सर्वाधिक बळी?

दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांमध्ये २० ते ३९ वयोगटातील अधिक रुग्ण आढळले आहेत. मागील २३ दिवसांत या वयोगटातील २९०६, तर ४० ते ५९ वयोगटातील २७६५ रुग्ण आढळले आहेत. 

दुसऱ्या  लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत ज्येष्ठांच्या तुलनेत तरुणांचे प्रमाण निश्चितच अधिक आहे. तरुण मंडळी कामासाठी किंवा इतर काही कारणांसाठी बाहेर निघत असल्याने आणि ते आरोग्याच्या दृष्टीने सतर्क असल्याने त्यांच्याकडून चाचण्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच हा आकडा काहीसा जास्त दिसत आहे  - संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या