शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Thane: ठाण्यात पावणेचार लाख रुग्ण बरे; ३९ लाख सात हजार नागरिकांनी केली टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 23:40 IST

काेराेनाकाळात मिळताे आहे दिलासा : ३९ लाख सात हजार नागरिकांनी केली टेस्ट

अजित मांडकेठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण झपाट्याने वाढत असले, तरी आता जिल्ह्याला दिलासा देणारी बाबदेखील समोर आली आहे. काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४१ हजार १८० रुग्ण कोरोनाने बाधित झाले आहेत, तर याच कालावधीत तब्बल ३ लाख ८२ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे निश्चितच नव्याने पॉझिटिव्ह होणाऱ्या रुग्णांसाठी ही चांगली गोष्ट म्हणावी लागणार आहे. कोरोनावर वेळीच उपचार केले तर रुग्ण पूर्णपणे बरा होत आहे. विशेष म्हणजे एप्रिलच्या अवघ्या २४ दिवसांत जिल्ह्यात तब्बल एक लाख ९१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. आतापर्यंत ३९ लाख ७ हजार ७१४ जणांची कोरोना चाचणी केली असून, त्यात चार लाख ४१ हजार १८० रुग्ण बाधित झाले आहेत, तर तीन लाख ८२ हजार बरे झाले. सात हजार १३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५१ हजार ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दोन महिन्यांपासून ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढताना दिसत आहे. रोजच्या रोज जिल्ह्यात चार ते पाच हजारांच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. त्यातही मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. मार्चअखेर जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ३ लाख १९ हजार ११ एवढी होती, तर एप्रिलअखेर ही संख्या ४ लाख ४१ हजार १८० एवढी झाली आहे. 

घाबरू नका, आम्हीही हरवले कोरोनालामी आणि माझी पत्नी दोघेही कोरोनाबाधित झालो होतो. परंतु, कोरोना झाला म्हणून आम्ही हरलो नाही. आम्ही वेळेत कोरोना चाचणी केली आणि दोघेही रुग्णालयात दाखल झालो. दहा दिवस योग्य उपचार घेऊन आम्ही आमच्या कुटुंबात परत आलो.     - रवींद्र क्षीरसागर  - ज्येष्ठ नागरिक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या