शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पॉझिटिव्ह-क्वारंटाइन एकत्रच; वाड्यातील रुग्णांत भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 23:19 IST

वाडा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२३ वर

वाडा : पालघर जिल्ह्यासाठी ३०० खाटा असलेले कोविड सेंटर तालुक्यातील पोशेरी येथे सुरू केलेले आहे. मात्र, या सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व क्वारंटाइन असे दोन्हीही एकाच ठिकाणी असल्याने व एकाच प्रसाधनगृहाचा वापर दोन्ही रुग्ण करीत असल्याने क्वारंटाइन रुग्णांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याचबरोबर येथे सुविधांचाही अभाव असल्याने रुग्ण नाराजी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, एकट्या वाडा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२३ वर पोहोचली आहे.तालुक्यातील पोशेरी येथील कोविड सेंटरमध्ये अनेक कोरोना पॉझिटिव्ह व क्वारंटाइन केलेले रुग्ण उपचार घेत आहेत. दोन्हीही रुग्ण एकाच ठिकाणी असल्याने क्वारंटाइन केलेल्या रुग्णांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या सेंटरमध्ये एकच प्रसाधनगृह असल्याने पॉझिटिव्ह व क्वारंटाइन रुग्णांना एकाच प्रसाधनगृहाचा वापर करावा लागत असल्याने क्वारंटाइन केलेल्या रुग्णांना कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे प्रसाधनगृहात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शौचालयात स्वच्छता नाही, वॉश बेसिन पाण्याने तुंबून भरले आहेत. अशा प्रकारे कोविड सेंटर हे घाणीचे साम्राज्यात असल्याची माहिती क्वारंटाइन केलेल्या रुग्णांनी दिली.सुरुवातीला आहारामध्ये खीर, दूध, काढा यांचा समावेश असायचा, परंतु आता तसे काहीच दिसत नाही. खोलीमध्ये स्वच्छता केली जात नाही. एकंदरीत, येथील वातावरण बघता एखादी चांगली व्यक्तीदेखील आजारी पडू शकेल, असे वातावरण कोविड सेंटरमध्ये असल्याचे रुग्णांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. यासंदर्भात कोविड सेंटरचे प्रमुख तथा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील आरोपांचे खंडण केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या