शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: भीती अन् धास्तीच्या वातावरणात रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 02:53 IST

सुरक्षिततेच्या दृष्टीने वापरण्यात येणारे पीपीई किट काढल्याशिवाय पाणीदेखीलही पिता येत नाही. मात्र, या संकटातही रुग्णालय प्रशासन आमची वेळोवेळी काळजी घेत असल्याच्या भावना परिचारिकांनी जागतिक परिचारिका दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमतजवळ व्यक्त केल्या.

- पंकज रोडेकर   ठाणेठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्तव्य बजावताना, प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाजवळ जावे लागते. त्यावेळी मनात एक प्रकारे भीती असते. आपल्यामुळे घरच्यांना लागण तर होणार नाही ना, अशी मनात धास्ती असते. परंतु, रुग्ण हे शिकलेले असल्याने त्यांच्याकडून आणि घरच्या मंडळींकडून सहकार्य मिळते. सुरक्षिततेच्या दृष्टीने वापरण्यात येणारे पीपीई किट काढल्याशिवाय पाणीदेखीलही पिता येत नाही. मात्र, या संकटातही रुग्णालय प्रशासन आमची वेळोवेळी काळजी घेत असल्याच्या भावना परिचारिकांनी जागतिक परिचारिका दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमतजवळ व्यक्त केल्या.ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले गेले. येथे परिचारिकांनी सात दिवस ड्युटी केल्यावर सात दिवस सुटी मिळू लागली. त्यांना घरी जाणे शक्य नव्हते, त्यांची रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली गेली. पण, जे घरी जातात, त्यांच्यामुळे घरातील मंडळींना लागण होऊ नये, याबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. कुटुंबासोबत असून त्यांच्यात सहभागी होता येत नाही. कुणाशीही बोलताना तीन ते चार फुटांचे अंतर ठेवावे लागते. रुग्णालय प्रशासनाकडून पुरेपूर काळजी घेतली जाते. प्रोटिनयुक्त आहार देण्याबरोबर पुरेसा आराम करणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना केल्या जात असल्याचे परिचारिकांनी सांगितले.दृष्टिकोन बदललामहामारीच्या सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांकडे नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. त्यातून काही आरोग्य कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. पोलिसांचे सहकार्य लाभल्याने आता रुग्णालयातील कोणालाही असा त्रास होत नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर ड्युटी केल्यावर आठवडाभर सुटी मिळत आहे. त्या दिवसांत कुटुंबासोबत असताना त्यांच्यामध्ये सहभागी होता येत नाही, याचे दु:ख वाटते. पण, ते दु:ख त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या तुलनेत महत्त्वाचे नाही. ही जागतिक महामारी लवकरात लवकर संपवावी, असे आता वाटत आहे.- अनुराधा देशमुखरुग्णालय आणि कुटुंब सांभाळताना धावपळ होते. त्याला पर्याय काढून घरातील कामाचे वर्गीकरण केले गेले आहे. अत्यावश्यक सेवेत असल्याने आणि त्यातच रुग्णालयाची अधिसेविका यासारख्या मोठ्या पदावर असल्याने घरच्यांचे सहकार्य वेळोवेळी मिळत आहे. त्यांच्या सहकार्याने घरातील व इतर कामेही सुरळीत होत आहेत.- प्रतिभा बर्डे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलthaneठाणे