शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

Coronavirus News:ठाण्यात कोरोनाची तपासणीसाठी जाणाऱ्या महिलेची सोनसाखळी हिसकावली: दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 00:05 IST

कोरोनाची तपासणी करण्यासाठी जाणा-या भास्कर कॉलनीतील एका ५९ वर्षीय महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळालेल्या दोन अल्पवयीन आरोपींना नौपाडा पोलिसांनी बुधवारी अवघ्या ४८ तासांत अटक केली. विशेष म्हणजे पतीला कोरोना झाल्यामुळे या महिलेला कॉरंटाईन करण्यात आले. परंतू, केवळ फोनवरुन दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत या जबरी चोरीतील दोन तोळयांच्या सोनसाखळीसह सुमारे दीड लाखांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला.

ठळक मुद्दे नौपाडा पोलिसांची कामगिरी सोन्याच्या मंगळसूत्रासह दीड लाखांचा ऐवज हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाची तपासणी करण्यासाठी जाणाºया भास्कर कॉलनीतील एका ५९ वर्षीय महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळालेल्या दोन १७ वर्षीय तरुणांना नौपाडा पोलिसांनी बुधवारी अवघ्या ४८ तासांमध्ये अटक केली. त्यांच्याकडून जबरी चोरीतील दोन तोळयांची सोनसाखळी, चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आणि मोबाइल असा सुमारे दीड लाखांचा ऐवजही जप्त केला आहे.नौपाड्यातील भास्कर कॉलनी परिसरात राहणारी ही महिला तिच्या पतीसह २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कोरोनाची तपासणी करण्यासाठी मिलेनियम लॅब येथे जात होती. ते होरायझन रुग्णालयाच्या गेटसमोरील रस्त्याने जात होते. त्याचवेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांचे ८५ हजारांचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून तिथून पलायन केले. कोरोना तपासणीत पती पॉझिटिव्ह आले. तर या महिलेला कॉरंटाईन करण्यात आले. त्यामुळे केवळ फोनवरुन २२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास या महिलेने या जबरी चोरीची तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फूटेज आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संबंधित मोटारसायकल आणि चोरटयांचे वर्णन पोलिसांना मिळाले. जबरी चोरी करणारे दोन्ही अल्पवयीन असून ते तीन हात नाका येथील गुरुद्वाराजवय येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक विनोद लबडे यांना मिळाली. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लबडे, जमादार सुनिल अहिरे, पोलीस नाईक सुनिल राठोड, साहेबराव पाटील, संजय चव्हाण आणि विकास चनचडकर आदींच्या पथकाने या दोघांनाही २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन तोळयांचे मंगळसूत्र आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. त्यांना ६ आॅक्टोबरपर्यंत बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश भिवंडीच्या बाल न्यायालयाने दिले आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी