शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कंटेनमेंट झोन सील करणार, लॉकडाऊनवर शोधला पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 00:23 IST

लॉकडाऊनच्या मागणीस नागरिकांचा वाढता विरोध पाहता महापालिका प्रशासनाने मध्यम मार्ग काढत कंटेनमेंट झोन सील करण्याची मात्रा शोधली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, लॉकडाऊनच्या मागणीस नागरिकांचा वाढता विरोध पाहता महापालिका प्रशासनाने मध्यम मार्ग काढत कंटेनमेंट झोन सील करण्याची मात्रा शोधली आहे. त्यानुसार, शनिवारपासून कोरोनाचे रुग्ण ज्या प्रभागांमध्ये वाढताहेत, अशा जवळपास ३३ प्रभागांमधील कंटेनमेंट झोन सील करण्यात येणार आहेत. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.महापालिका हद्दीत शुक्रवारी कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४८७३ झाली होती. गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे ३२३ नवे रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा एकदा १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती. या मागणीला अन्य आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र, हा निर्णय आयुक्तांच्या पातळीवर घेतला जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. पालकमंत्र्यांची बैठक २0 जून रोजी झाली. अनलॉक-१ मध्ये पुन्हा जनजीवन सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाऊन करणे शक्य नाही. लॉकडाऊन करता येत नसले, तरी वाढत्या रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. लॉकडाऊन करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. महापालिका हद्दीत सुरुवातीला डोंबिवलीत जास्त रुग्ण आढळून येत होते. आता डोंबिवलीला कल्याणने मागे टाकले. कल्याणमध्ये पश्चिमेत जास्त रुग्ण आढळून येत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ९६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती गंभीर आहे. त्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा अपुरी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर आयुक्तांनी महापालिका हद्दीत ज्या ठिकाणी कोरोनाचे जास्त रुग्ण आढळत आहेत, ते कंटेनमेंट झोन सील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची यादी प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. महापालिका हद्दीत आजमितीस ११७ कंटेनमेंट झोन आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात रुग्ण जास्त असलेल्या ३३ प्रभागांमधील कंटेनमेंट झोन सील करण्यात येणार आहेत.>राज्य राखीव पोलिसांची मदत घेणारकंटेनमेंट झोन सील केल्यानंतर तेथील परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी राज्य राखीव पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. राज्य राखीव पोलीस मागविण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी पोलीस प्रशासनावर सोडला आहे. राज्य राखीव पोलीस मागविण्यात येणार आहेत, याला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.>या प्रभागांतील झोन होणार सीलमांडा पूर्व, पश्चिम, मोहने गावठाण, गौरीपाडा, चिखलेबाग, गोविंदवाडी, रोहिदासवाडा, जोशीबाग, हनुमाननगर, दुर्गानगर, विजयनगर, तीसगाव गावठाण, कोळसेवाडी, चिकणीपाडा, जरीमरीनगर, गणोशवाडी, आनंदवाडी, शिवाजीनगर, चोळेगाव, शिवमार्केट, सावरकर रोड, सारस्वत कॉलनी, रामनगर, म्हात्रेनगर, सुनीलनगर, तुकारामनगर, आनंदनगर, ठाकूरवाडी, नवागाव, कोपर रोड, नांदिवली पंचानंद या प्रभागांमध्ये असलेले कंटेनमेंट झोन सील केले जाणार आहेत. या झोनमध्ये सकाळी ५ ते ९ या वेळेत दूध मिळू शकणार आहे. याशिवाय, सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत किराणा दुकाने होम डिलिव्हरीसाठी सुरू राहतील.सील करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोनमधून येजा करता येणार नाही. यापूर्वीही कंटेनमेंट झोनमधून येजा करण्यास मनाई होती. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी झोनमध्ये एकच एण्ट्री पॉइंट ठेवला होता. त्याठिकाणी होमगार्ड व पोलीस तैनात करण्यात आले होते.