शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: मुंब्य्रातून लखनौला पळून जाण्याच्या प्रयत्नातील महिलेला ठाणे पालिका प्रशासनाने घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 01:03 IST

मुंब्य्रातील कॉरंटाईन सेंटरमध्ये जाण्याऐवजी एका महिलेने चक्क मुंबई विमानतळावरुन लखनौला जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, मुंबई पोलीस आणि ठाणे महापालिकेतील आरोग्य विभागाच्या चाणाक्ष अधिकाऱ्यांनी आरोग्य अ‍ॅपच्या मार्फतीने तिच्यासह मुलांनाही ताब्यात घेत त्यांना पुन्हा मुंब्रा येथील विलगीकरण केंद्रामध्ये कॉरंटाईन केले आहे.

ठळक मुद्देमुलांपासून विलग होण्याच्या भीतीने केला होता पलायनाचा प्रयत्न आरोग्य सेतू अ‍ॅपच्या मदतीने सापडली मुंबई विमानतळावर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाग्रस्त महिलेने मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेण्याचा बहाणा करीत मुंब्रा येथून थेट लखनौ येथील आपल्या गावी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, कौसा येथील ठाणे महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने या महिलेला तिच्या तीन मुलांसह मुंबई विमानतळावरुन नुकतेच ताब्यात घेण्यात आले आहे. या चौघांनाही आता मुंब्रा येथील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.एकीकडे गंभीर अवस्थेतील कोरोनाचे रुग्ण गायब झाल्यानंतर ते थेट मृत पावल्याचे आणि त्यांच्यावर दुसºयानेच अंत्यसंस्कार केल्याच्या घटनांनी पालिका प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. असे असतांना काही काही जागृक अधिकाºयांमुळे परराज्यात पळून विमानाने पलायनाच्या प्रयत्नातील कोरोनाग्रस्त महिलेला तिच्या तीन मुलांसह पुन्हा ताब्यात घेण्यात ठामपाला यश आले आहे.मुंब्रा कौसा येथे एका रुग्णाचा गेल्या आठवडयात कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याची पत्नी आणि तीन मुले त्याच्या सोबतच वास्तव्याला होते. या चौघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनाही रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला पालिका प्रशासनाने दिला होता. मात्र, मुंबईच्या सेव्हन हिल्स रु ग्णालयात उपचार घेऊ, असे सांगून ही महिला मुलांसह मुंबईत गेली. तिकडे मात्र सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल न होता तिने लखनौ येथे आपल्या गावी जाण्यासाठी विमानतळ गाठले. दरम्यान, रुग्णालयात दाखल होण्याऐवजी ती विमानतळावर पोहचल्याची माहिती तिच्या मोबाईलमधील आरोग्य सेतू अँपमुळे ठाणे आरोग्य विभागाला मिळाली. आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी तातडीने मुंबई पोलीसांच्या मदतीने तिच्यासह तिच्या तिन्ही मुलांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मुंब्रा येथील क्रीडा संकुलातील विलगीकरण कक्षात त्यांना कॉरंटाईन केले.मुंब्रा येथील रु ग्णालयात मुलांना आणि आपल्याला वेगवेगळे ठेवले जाईल, त्यामुळे मुलांपासून विलग व्हावे लागेल, या भीतीने आपण गावी नातेवाईकांकडे जाऊन उपचार घेणार होतो, अशी माहिती तिने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिली. 

‘‘ ही महिला कोरोनाग्रस्त असूनही ती उपचार घेण्याच्या नावाखाली मुंबईत गेली. मात्र उपचार रुग्णालयात दाखल होण्याऐवजी तिने विमानतळ गाठल्याचे समजल्यानंतर तातडीने हालचाली करुन मुंबई पोलिसांच्या मदतीने तिला मुलांसह ताब्यात घेतले.’’डॉ. हेमांगी घोडे, आरोग्य अधिकारी, कौसा.‘‘ मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात ही महिला उपचारासाठी जाणार होती. मात्र तिकडे न गेल्यामुळे मुंबई पोलीस आणि ठाणे महापालिका प्रशासनाने ताब्यात घेऊन आता विलगीकरण केंद्रात ठेवले आहे.’’मधुकर कडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा------------------------

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmumbraमुंब्रा