शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: न्यायालयीन कामकाजाला ठाणे आणि पालघर वकिल संघटनेने दर्शविला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 23:48 IST

न्यायालयाचे कामकाज 8 जूनपासून सुरू करण्याऐवजी 30 जून पर्यन्त सध्या आहे त्याप्रमाणेच जामीनाची सुनावणी, तातडीची प्रकरणे तसेच नविन खटल्यांची कामे सुरु ठेवावीत, असा ठराव ठाणे आणि पालघर जिल्हयातील वकिलांच्या रविवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. एका अ‍ॅपवर सुमारे ३०० वकिलांनी सहभागी होत हा ठराव केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे कोरोनाच्या पार्श्वभूमीव वकीलांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णयठाणे, पालघरच्या ३०० वकिलांनी घेतली आॅनलाईन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये (एसओपी ) मध्ये वकिलांच्या सुरक्षेचा कोणताही विचार केलेला नाही, असे मत ठाणे जिल्ह्यातील वकील संघटनेच्या रविवारी झालेल्या विशेष सभेमध्ये वकीलांनी मांडले. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज 8 जून पासून सुरू न करता 30 जून पर्यन्त सध्या आहे त्याप्रमाणे न्यायालयाने जामीनाची सुनावणी तसेच तातडीची प्रकरणे तसेच नविन खटल्यांची कामे सुरु ठेवावीत, असा ठराव सर्वानुमते मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे जिल्ह्यातील वकील संघटनेंच्या विशेष सभेमध्ये झूम अँप द्वारे नवी मुंबई, शहापूर, भिवंडी, वसई आणि कल्याण बार असोसिएशनचे पदाधिकारी तसेच वरिष्ठ वकिलांनी आपले मत व्यक्त केले. त्यामध्ये 8 जून पासून न्यायालयाचे कामकाज सुरु करण्याची परिस्थिती नाही, असे मत सर्वांनीच व्यक्त केले. तसेच उच्च न्यायालयाने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये (एसओपी ) मध्ये वकिलांच्या सुरक्षेचा कोणताही विचार केलेला नसल्याचेही मत मांडण्यात आले. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज 8 जून पासून सुरू न करता, 30 जूनपर्यन्त सध्या आहे त्याप्रमाणेच न्यायालयाने जामीनाची प्रकरणे आणि तातडीची तसेच नविन दाखली प्रकरणांची कामे सुरु ठेवावीत. तसेच 30 जून नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्ह्यतील वकील संघटनेंच्या सूचना विचारात घेण्यात याव्यात. तसेच वकीलांची सुरक्षितता विचारात घेऊन घेऊन मार्गदर्शक तत्वे तयार करावीत आणि कामकाज सुरु ठेवावे, असा ठराव या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे सदस्य अ‍ॅड. गजानन चव्हाण तसेच ठाणे बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत कदम आदी पाच जणांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीश आर. एम. जोशी यांची भेट घेतली. त्यांनाही या बाबी सांगण्यात आल्या. त्यांनी वकिलांच्या मागणीला सकारात्मकता दर्शविली आहे. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य तो तोडगा काढला जाईल, असेही न्या. जोशी यांनी या शिष्टमंडळाला स्पष्ट केले.

‘‘ सकाळी १० ते दुपारी १.३० आणि दुपारी २.३० ते सायं. ५ या वेळेत न्यायालयाचे कामकाज सुरु होणार आहे. मुळात, कंटेनमेंट झोनमधील वकीलाला न्यायालयात येण्याची परवानगी नाही. कोणी आला तर कसे ओळखणार? अशा अनेक बाबी आहेत. त्यामुळे ठाणे आणि पालघर जिल्हयाच्या सुमारे ३५० वकीलांनी एकत्र येत झूम अ‍ॅपवर बैठक घेऊन या कामकाजाला विरोध केला आहे.गजानन चव्हाण, सदस्य, महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद, मुंबई.

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCourtन्यायालय