शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रेमडेसिवीरसाठी रुग्णांच्या नातेवाइकाची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:30 IST

अंबरनाथ, बदलापूरमध्ये काळाबाजार : अनेक रुग्णांचा जीव धोक्यात

- पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात कोविड रुग्णांना गरज भासणार रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात नातेवाईकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धडपड करावी लागत आहे. ते करुनही इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. एवढेच नव्हे तर इंजेक्‍शनचा काळाबाजार ही तेजीत सुरू आहे.अंबरनाथ आणि बदलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना त्यातील गंभीर झालेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासत असल्याने संबंधित डॉक्टर ते इंजेक्शन आणण्याचा सल्ला कुटुंबीयांना देतात. मात्र प्रत्यक्षात हे इंजेक्शन कोठेच उपलब्ध होत नसल्याने एकेका इंजेक्शनसाठी धडपड करण्याची वेळ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. मुळात इंजेक्शन अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये उपलब्ध होत नसल्याने अंबरनाथच्या नागरिकांना थेट कल्याण किंवा ठाणे येथे इंजेक्शनसाठी जावे लागत आहे.अंबरनाथमध्ये ज्या खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरु आहे त्यांच्याकडून या इंजेक्शनची मोठी मागणी असून ती पुरविण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत आहे, तर दुसरीकडे पालिकेच्या कोविड रुग्णालयात एकही इंजेक्शन उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. बदलापूर, अंबरनाथच्या सरकारी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतानाही जिल्हा प्रशासन पालिकेला हे इंजेक्शन उपलब्ध करून देत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने त्या ठिकाणच्या नातेवाईकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले असून त्यातील ४० ते ५० रुग्ण हे गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्यांना उपचारादरम्यान लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.रेमडेसिवीर इंजेक्शनचा संपूर्ण जिल्ह्यात तुटवडा आहे. त्यामुळे पालिकेच्या कोविड रुग्णालयातही इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याची बाब खरी आहे.-डॉ. नितीन राठोड, नोडल ऑफिसर, अंबरनाथ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या