शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात तूर्तास तरी  ऑक्सिजनसाठी ‘नो टेन्शन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 03:32 IST

पुरेसा साठा उपलब्ध; जिल्हा आरोग्य प्रशासनाची माहिती

ठाणे : राज्यात अनेक ठिकाणी लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. ठाणे जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून रेमेडिसीवर इंजेक्शनसुद्धा मिळणे कठीण झाले आहे. परंतु, दुसरीकडे जिल्ह्यासाठी समाधानाची बाब समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून जिल्ह्यात पाच शासकीय रुग्णालयांमध्ये लिक्विड ऑक्सिजन टाकी बसविण्यात आल्याने सध्याच्या घडीला ड्युरा, जम्बो आणि छोटे ऑक्सिजन टाक्या सज्ज ठेवल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कुठल्याही शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता पडणार नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात तूर्तास तरी ऑक्सिजनसाठी नो टेन्शन असेच चित्र दिसत आहे.ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केला. यावेळी कमी प्रमाणात असलेल्या बाधित रुग्णांच्या संख्येत एप्रिल, मे, जून आणि जुलै महिन्यात दिवसागणिक वाढत गेली. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येदेखील बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या, रुग्णवाहिका मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून करण्यात येत होत्या. त्यात अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे ऑक्सिजन अभावीदेखील कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, कोरोना या आजाराने मार्च महिन्यापासून सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. त्यातही मागील वर्षीच्या तुलनेत सध्या रुग्णांची संख्या कित्येक पटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसींपाठोपाठ ऑक्सिजनचादेखील तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासन द्विधा संकटात सापडले आहे. अशातच ठाणे जिल्ह्यात अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असून ऑक्सिजनची चिंता नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यातील पाच शासकीय रुग्णालयांमध्ये लिक्विड ऑक्सिजन टाकी बसविली आहे. तर, २४ ड्युरा सिलिंडर, ४०० जम्बो आणि ३०० छोटे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  असे आहे ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू टाळण्यासाठी शासनाच्यावतीने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात १० किलो लीटरची एक टाकी, शहापूर उपजिल्हा रुग्णालय, उल्हासनगर ४ येथील शासकीय मॅटर्निटी होम आणि हॉस्पिटल, मध्यवर्ती जिल्हा रुग्णालय, भिवंडी येथील कोविड केअर सेंटर आणि डेडिकेटेड कोविड सेंटर या ठिकाणी प्रत्येकी एक ६ किलो लीटरची टाकी बसविल्या आहेत.  ठाणे जिल्ह्यातील पाच शासकीय रुग्णालयांमध्ये अद्ययावत पद्धतीच्या लिक्विड ऑक्सिजन टाकी बसविण्यात आल्या आहेत. तसेच ड्युरा, जम्बो आणि छोटे ऑक्सिजन सिलिंडरचा अतिरिक्त साठा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसाठी उपलब्ध आहे. तसेच कोविड रुग्णांना लागणारे औषधेदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांना कोणत्याही प्रकारची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची संपूर्ण काळजी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.- डॉ. सुभाष पवार, मुख्य औषध निर्माता, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या