शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना महामारीत लिंबू, संत्री, मोसंबीचा राेगप्रतिकारकशक्तीचा उतारा महागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 00:02 IST

वाढत्या मागणीमुळे दर वाढले : ‘क’ जीवनसत्त्व ठरते शरीराला पाेषक

- मुरलीधर भवारकल्याण : कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, त्यावर सगळ्य़ात महत्त्वाचा उतारा हा लिंबू, संत्री आणि मोसंबीचा मानला जात आहे. त्यामुळे लिंबू, संत्री, मोसंबीला बाजारात जास्त मागणी आहे. यांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. कारण त्यात क जीवनसत्त्व जास्त आहे. ते शरीराला लाभदायक ठरते. कोरोनावर अद्याप ठोस औषध बाजारात उपलब्ध नाही. कोरोनाची लस बाजारात उपलब्ध झाली आहे. मात्र, लसीकरणाची प्रक्रिया अद्याप सगळ्य़ांसाठी सुरू नाही. महापालिकेच्या रुग्णालयातून लसीकरण मोफत केले जात आहे, तर खासगी रुग्णालयात लसीसाठी २५० रुपये मोजावे लागतात. कोरोनाची लस बाजारात येण्यापूर्वी अनेक गोष्टी सुचविल्या जात होत्या. त्यात कोणत्या फळांचे सेवन करावे, असे सांगितले जात होते. ज्याची रोगप्रतिकारशक्ती जास्त त्यांना कोरोनाची लागण लवकर होत नाही. ती झाल्यास रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्यास रुग्ण कोरोनावर मात करून त्यातून बरा होतो. अनेकांच्या सेवनात क जीवनसत्त्वाचा अभाव असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी दिसून येते. त्यांची इम्युनिटी पॉवर कमी असते. आहारशास्त्रज्ञांच्या मते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात समप्रमाणात क जीवनसत्त्व असलेल्या फळांचे नियमित सेवन केल्यास ती वाढते. त्यामुळे आजही सकाळीच व्यायामाला जाणारे लोक ज्यूस सेंटरमध्ये लिंबू सरबत आणि मोसंबी आणि संत्र्यांचा ज्यूस पिण्यास पसंती देताना दिसून येत आहेत. अनेक ज्यूस सेंटरचालकांनी कोरोनाकाळात या तीन ज्यूसला प्राधान्य दिले आहे. ग्राहकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ज्यूस सेंटरचालकांनीही चंग बांधल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या कोरोनाचा कहर वाढत असल्याने मैदानानजीक असलेल्या ज्यूस सेंटरचा ग्राहक कमी झाला आहे. फळांशी संबंधित दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे. त्यामुळे फळांची खरेदी वाढली आहे.आवक कुठून होते संत्री मोसंबीची आवक अमरावती, नागपूर येथून होते, तर लिंबू हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून जास्त प्रमाणातून बाजारात येतो. सध्या कोरोनाकाळात शेतमाल वाहतुकीस मुभा असली तरी माल कमी येत आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली आहे.तज्ज्ञ काय म्हणतात... क जीवनसत्त्वाची फळे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते, हे खरे आहे. मात्र, त्यांच्या सेवनामुळे कोरोनावर मात करता येईल, याचा दावा करता येत नाही. रोगप्रतिकारशक्ती वाढल्यास कोरोना रोखण्यासाठी ती कदाचित उपयुक्त पडू शकते. शंभर टक्के उपयुक्त पडेल, असा दावा करता येत नाही. मात्र, कोरोना आला म्हणून क जीवनसत्त्वाच्या फळांच्या सेवनाचा अतिरेक करून चालणार नाही. काही प्रमाणातच त्यांचे सेवन केले जावे.- डॉ. प्रा. उदयकुमार पाध्ये, आहारतज्ज्ञनियमित क जीवनसत्त्वाचे सेवन करतो. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सेवन करीत आहे. केवळ क जीवनसत्त्वाची फळे खात नाही. त्यासोबत नियमित व्यायामही करतो.-राजू शेट्टी२. मला कोरोना झाला होता. त्यावेळी मला डॉक्टरांनी  क जीवनसत्त्व असलेली फळे खाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मोसंबी आणि संत्री ही फळे मी खाल्ली. मला लवकर तंदुरुस्त होण्यास त्यामुळे मदत झाली. -सोपन वरगडे दर का वाढले : कोरोनामुळे लिंबू, मोसंबी आणि संत्री यांचे दर वाढलेले आहेत. बाजारात लिंबू आणि मोसंबी मिळत आहे. मात्र, संत्रीची आवक जास्त नाही. संत्रीची आवक कमी असल्याने त्याच्या दरात वाढ झाली आहे. जवळपास ३० ते ४० टक्के दरवाढ झालेली दिसून येत आहे. फळे    जानेवारी    फेब्रुवारी    मार्च    एप्रिललिंबू    १०,     १५,     २०,     ४० रुपये.मोसंबी    ४०,     ४५,     ५०,     ६० रुपये.संत्री    ८०,     १००,     १२०,     २४० रुपये.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या