शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

CoronaVirus News: जि.प. कर्मचाऱ्यांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:44 IST

इमारत ठरली धोकादायक; २२ कुटुंबे होणार बेघर

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी सुमारे २० वर्षांपूर्वी उभारलेल्या इमारतीच्या स्ट्रक्चरल आॅडिटच्या अहवालात तिला धोकादायक म्हणून घोषित केल्यानंतर प्रशासनाने तीत राहणाºया कर्मचाºयांच्या २० ते २२ कुटुुंबांना तत्काळ घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे त्यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून आता कोरोनाच्या संकटात जायचे कुठे, असा सवाल त्यांनी केला आहे.ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील श्रीनगर येथे जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांची अल्पबचत विकास इमारत आहे. तळ अधिक चार मजल्यांच्या दोन इमारती आहेत. या इमारतींत सुमारे २० ते २२ कुटुुंबे राहत असून ती अंदाजे १५ ते २० वर्षे जुनी आहे. या इमारतीत केवळ ठाणे जिल्हा परिषदेतील कर्मचारी राहत नसून कोकण भवन, आरोग्य विभागातील कर्मचारी वास्तव्यास आहेत. या इमारतींना अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. या इमारतींत पाण्याची मुख्य समस्या येथील रहिवाशांना भेडसावत होती. तर, अनेकदा सांडपाणीमिश्रित पाणी येत असल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी संबंधित अधिकाºयांशी चर्चा करून पाणीप्रश्न सोडविला होता. तसेच इमारतींबाबत ज्या काही दुरुस्त्या आहेत, त्या दुरुस्त्यांच्या कामाच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या.त्यानुसार, ज्या रहिवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने ज्या दुरुस्त्या करणे आवश्यक होते, त्या केल्या होत्या. स्ट्रक्चरल आॅडिटनंतर घेतला निर्णयवारंवार या इमारतींतील रहिवाशांकडून नादुरुस्तीच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे वारंवारच्या या तक्रारींच्या अनुषंगाने बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे आणि मुख्यालय शाखा अभियंता दत्तू गीते यांनी संपूर्ण इमारतींची पाहणी करून या इमारतींचे एप्रिल महिन्यात स्ट्रक्चरल आॅडिट केले.त्यात ही इमारत धोकादायक असून राहण्यास अयोग्य असल्याचे सिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेऊन रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यानुसार, ती रिक्त करून तिचे निर्लेखन करण्यात येणार आहे. तिच्या निर्लेखन प्रस्तावालादेखील महासभेने मंजुरी दिली आहे.