शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
4
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
5
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
6
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
7
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
8
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
9
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
10
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
11
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
12
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
13
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
14
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
16
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
17
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
18
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
19
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
20
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार

CoronaVirus News: अंत्यविधींसाठी शहरांमधील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 23:54 IST

कोविडचा प्रादुर्भाव; लगतच्या शहरांतील मृत रुग्णांचेही अंत्यसंस्कार

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरूच आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. प्रतिदिन रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ४ ते ५ असले तरी कोरोनाच्या पहिल्या लाटेत काही मृतदेहांची अंत्यसंस्काराविना झालेली हेळसांड पाहता केडीएमसीने दुसऱ्या लाटेत मात्र पुरती खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कोविड मृत रुग्णांचे अंत्यसंस्कार गॅस शवदाहिनीमध्ये करावेत या सरकारी आदेशानुसार मनपाकडून दोन्ही शहरांमध्ये एकूण सहा ठिकाणी गॅस शवदाहिन्यांची सुविधा उपलब्ध केली आहे. यात मनपा हद्दीबाहेरील लगतच्या शहरांतील कोविड मृत रुग्णांचे याठिकाणी हाल होत आहेत.कोराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण केडीएमसीच्या हद्दीत १४ मार्च रोजी आढळला. लॉकडाऊननंतरचा काही मधला कालावधी वगळता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट देशासह राज्यात आली आहे. यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला हजारोंच्या संख्येने वाढत आहे. सोमवारपर्यंतचा आढावा घेता कोरोनाबाधितांचा आकडा ८५ हजार ४९७ पर्यंत पोहोचला आहे. एक हजार २७१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मागील कोरोनाच्या लाटेत दरदिवशी मृत्यूचे प्रमाण जुलै ते ऑगस्टदरम्यान १० ते ११ होते. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण दाेन ते चार असे आहे. मागील कालावधीत गॅस शवदाहिन्यांच्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मृतदेहांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड झाली होती. काही ठिकाणी मग लाकडांवर अंत्यसंस्कार उरकून घेण्याची नामुष्की ओढावली होती. कोरोना मृत रुग्णाला प्लास्टिकमध्ये गुंडाळून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जायचे. मृतदेह जळताना ते प्लास्टिक शवदाहिनीच्या पट्ट्यामध्ये अडकून मशीन खराब होण्याचे प्रमाण वारंवार घडत होते. डोंबिवलीतील रुग्णांचा मृतदेह कल्याणला, तर कल्याणमधील मृतदेह डोंबिवलीला अशी फरपट व्हायची. केडीएमसी हद्दीत ६० स्मशानभूमी, तर सात ठिकाणी दफनभूमी आहेत. या ठिकाणी शवदाहिनीमागचा अनुभव पाहता केडीएमसी यंदा पूर्ण सज्ज झाली आहे. सहा ठिकाणच्या स्मशानभूमींमध्ये शवदाहिनीची सुविधा देण्यात आली आहे. यात कल्याणमधील लालचौकी, बैलबाजार, मुरबाड रोड आणि विठ्ठलवाडी स्मशानभूमी, तर डोंबिवलीतील शिवमंदिर आणि पाथर्ली याठिकाणच्या स्मशानभूमींमध्ये ही सुविधा उभारण्यात आली आहे.बाहेरील मृत रुग्णांचेही होतात अंत्यसंस्कारकल्याण-डोंबिवली शहरात मनपाच्या वतीने सहा गॅस शवदाहिन्या उभारल्या असल्या तरी तेथे मनपा हद्दीसह बाहेरील मृत रुग्णांचे अंत्यसंस्कार होत आहेत. डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत होणाऱ्या अंत्यसंस्काराचा आढावा घेता, येथे सध्या नैसर्गिक आणि कोविडने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे दिवसभरात १२ ते १४ अंत्यसंस्कार होत आहेत. शिळफाटा, अंबरनाथ, उल्हासनगर येथील मृतदेहही अंत्यसंस्कारासाठी येथे आणले जातात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या