शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : आधी लढा कोरोनाशी, मग निवडणुकीशी, नेत्यांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 01:02 IST

CoronaVirus News : ही निवडणूक पुढे जाण्याची शक्यता असली तरी निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाज सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

अंबरनाथ/बदलापूर : कोरोनाचा प्रभाव एवढा वाढला आहे की त्याच्यासोबत लढत असताना अंबरनाथ आणि बदलापूरमधील नेत्यांना पालिका निवडणुकीचा विसर पडला आहे. निवडणूक लागेल तेव्हा बघू अशी भूमिका राजकीय मंडळींनी घेतली आहे. कल्याण- डोंबिवली महापालिकेची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होणे अपेक्षित आहे. ही निवडणूक पुढे जाण्याची शक्यता असली तरी निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाज सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. हे आदेश देत असताना निवडणूक आयोगाला अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिकेच्या निवडणुकींचा विसर पडल्याचे दिसते. या दोन्ही शहरांच्या निवडणुका मे महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाचा प्रभाव वाढल्याने त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ही निवडणूक होणार कधी याची निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नेतेही कोरोनाशी लढण्यात व्यस्त असल्याने त्यांनीही निवडणुकीचे स्वप्न डोक्यातून बाजूला ठेवले आहे. निवडणुका लागतील तेव्हा बघून घेऊ अशा भूमिकेत दोन्ही शहरातील राजकारणी आहेत. सध्या नागरिकांचा जीव महत्त्वाचा असून निवडणुका नाही झाल्या तरी फरक पडत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.>आज परिस्थिती निवडणुकीची नसून कोरोनाशी सामना करण्याची आहे. आज राजकीय पक्षातील प्रत्येक पदाधिकारी आपापल्या परीने या लढाईत सहभागी झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत निवडणुकीचा विचार करणे चुकीचे आहे.- प्रदीप पाटील, अध्यक्ष, अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस>ही वेळ निवडणुकीचा विचार करण्याची नाही. सर्व पक्षांनी एकत्र येऊन कोरोनाचा प्रभाव कमी करण्याकडे लक्ष देण्याची आहे. आज आमचे सर्व पदाधिकारी कोरोनाशी लढण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या डोक्यात निवडणुकीचा विचार नाही.- वामन म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख, बदलापूर