शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ठाण्यातील प्रदूषणात कमालीची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 01:12 IST

CoronaVirus News : शहरातील विविध चौकांचा समावेश असलेल्या तीनहातनाका गटाचा समावेशदेखील ग्रीन झोनमध्ये झाला आहे. येथील हवा केवळ ११ टक्केच प्रदूषित असल्याचे आढळले आहे.

ठाणे : कोरोना रुग्ण दरवाढीचा वेग १० दिवसांवरून २९ दिवसांवर आल्यामुळे ठाणेकरांना दिलासा मिळाला असतांना हवेतील प्रदूषणातही कमालीची घट झाली आहे. ठाण्यातील काही भागांची हवा ही आता अतिशुद्ध झाल्याने हे परिसर आता ग्रीन झोनमध्ये समाविष्ट झाले आहेत. यात शहरातील विविध चौकांचा समावेश असलेल्या तीनहातनाका गटाचा समावेशदेखील ग्रीन झोनमध्ये झाला आहे. येथील हवा केवळ ११ टक्केच प्रदूषित असल्याचे आढळले आहे.हवेतील प्रदूषणात झालेली कमालीची घट ही ठाणेकर नागरिकांसाठी आनंदाची बाब मानली जात आहे. मागील काही वर्षांत ठाण्यातील एखाद्या भागाचे अशा प्रकारे हवेच्या गुणवत्तेत ग्रीन झोनमध्ये समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लॉकडाऊनच्या काळात ठाण्यातील हवेतील प्रदूषणात बऱ्यापैकी सुधारणा झाली होती. परंतु, अनलॉकनंतर शहरातील प्रदूषणात पुन्हा वाढ होईल, असे चित्र होते. अनलॉकमध्ये ठाण्यातील रस्त्यांवर वाहने धावण्यास सुरुवात झाल्यानंतरही शहरातील प्रदूषणात कमालीची घट झाली आहे.सोमवारी २२ जूनला दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी ठाणे महापालिका हद्दीत प्रदूषणात ७१ टक्क्यांची घट झाली असून शहरातील हवा सरासरी २९ टक्केच अशुद्ध असल्याने मध्यम शुद्ध पिवळ्या गटात नोंदली गेली आहे. परंतु, ठाण्याच्या इतिहासात प्रथमच या गटात ११ टक्केच हवा प्रदूषित असल्याने त्याचा हिरव्या गटात समावेश झाला आहे.>१६ चौकांत प्रदूषणाचे प्रमाण हे ११ टक्केतीनहातनाका गटात शहरातील महत्त्वाच्या १६ चौकांमधील प्रदूषणाची मोजणी ही या अंतर्गतच केली जाते. त्यानुसार, या येथे प्रदूषणाचे प्रमाण हे ११ टक्केच आहे. त्यामुळे शहरातील विविध नाक्यांवरील हवा आता शुद्ध झाली असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. औद्योगिक परिसरातील रेप्टाकॉस ब्रेट अ‍ॅण्ड कंपनीअंतर्गत वागळे इस्टेट, शास्त्रीनगर आदी ठिकाणीही हवेतील प्रदूषणात मागील काही दिवसांत कमालीची घट झाली असून येथे तर ३० टक्के हवा प्रदूषित आढळली आहे.>संपूर्ण शहर पिवळ्या गटात, कोपरीत ४0 टक्के प्रदूषणनिवासी परिसर असलेल्या कोपरी प्रभाग कार्यालय, येथे ४० टक्के हवा प्रदूषित आढळली असल्याची नोंद झाली आहे. व्यावसायिक परिसर असलेल्या शाहू मार्केट नौपाडा परिसरात सर्वाधिक ३५ टक्के हवा प्रदूषित असल्याची नोंद झाली आहे. पालिकेच्या प्रदूषण विभागामार्फत केलेल्या या सर्वेक्षणात २२ जूनला दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी ही हवेतील शुद्धता नोंदली गेली आहे. तर, संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत सरासरी २९ टक्के हवा आता प्रदूषित असल्याने संपूर्ण शहराचा पिवळ्या गटात समावेश करण्यात आला आहे.