शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 23:21 IST

तपासणी अहवालानंतरही रुग्ण दिवसभर घरीच

वाडा : वाडा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण दररोज वाढत असून नव्याने पुढे आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करणे आवश्यक असताना प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवाल आल्यानंतरही संबंधित रुग्णांना दिवसभर घरीच थांबावे लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.वाडा तालुक्यात आठवडाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. समाजात कोरोनासंदर्भात प्रचंड भीती आहे. तालुक्यातील जामघर येथे आढळलेल्या रुग्णांना अहवाल प्राप्त झाल्यानंतरही तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात प्रशासनाने उदासीनता दाखवल्याने या रुग्णांना दिवसभर घरीच थांबावे लागल्याचे उघड झाले आहे. तर, वाडा पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पालघर येथे हलविण्यात आले. काही दिवसांपूर्वी आब्जे परिसरात आढळलेल्या रुग्णाला रुग्णवाहिके-अभावी कित्येक तास ताटकळत थांबावे लागल्याचे उघड झाले आहे.कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने रु ग्णांना वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे असताना आणि ग्रामीण भागात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण अधिक असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून फक्त दोन रुग्णवाहिका तालुक्यासाठी आहेत. आता आणखी बसचीही व्यवस्था करण्यात आली असून त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना लवकरात लवकर कोविड सेंटरपर्यंत पोहोचवता येईल.- उद्धव कदम, तहसीलदार, वाडा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या