शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात कोरोनाबाधित वृद्धाची रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 22:07 IST

अतिदक्षता विभागात सुरु होते उपचार; आत्महत्या केलेला रुग्ण भाजपा नगरसेवकाचे नातेवाईक

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या बाळकुम येथील कोविड ग्लोबल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या भिका सखाराम वाघुले (70) यांनी तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांचे ते चुलते होते.ठाण्यातील मार्केट परिसरात राहणारे वाघुले हे कोरोनाबाधित झाल्यामुळे त्यांना 21 ऑगस्ट रोजी ग्लोबल रुग्णालयात दाखल केले होते. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रस जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर 1 सप्टेंबरपासून अतिदक्षता विभागातील बेड क्रमांक-14 वर उपचार करण्यात येत होते. 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अचानक तोंडाचा ऑक्सिजन काढून या विभागाच्या खिडकीतून स्वत:ला झोकून दिले. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी कापूरबावडी पोलिसांना दिली. याबाबतचा अधिक तपास कापूरबावडी पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर पोलीस तसेच ठाण्यातील अनेक नगरसेवकांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. अतिदक्षता विभागात डॉक्टर तसेच परिचारिकांची संख्या ही इतर वॉर्डापेक्षा अधिक असते. तरीही, ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी: संजय भोईरकोरोना बाधित वृद्धाने आत्महत्या केल्याच्या घटनेमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी केली आहे. यापुढे अशा प्रकारे कोणीही आत्महत्या करणार नाही, याबाबत रुग्णालय प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. एका रुग्णाला डॉक्टरांनी नातेवाईकांशी बोलण्यास मज्जाव केला. असे न होता, रुग्णाची माहिती नातेवाईकांना दिली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या