शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

CoronaVirus News : वाड्यातील पोशेरी केंद्रात कोरोना रुग्णांची सेवा रामभरोसे, असुविधांमुळे रुग्ण हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:25 PM

CoronaVirus News: पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत. आरोग्य प्रशासनाने यासाठी विभागवार कोविड सेंटर उभारली आहेत.

- वसंत भोईर

वाडा : वाडा व नजीकच्या जव्हार, मोखाडा व विक्रमगड या तालुक्यांतील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तालुक्यातील पोशेरी येथे कोरोना सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र, या कोविड सेंटरमध्ये असुविधांचा पाढा आहे. बुधवारी रात्री सुमारे तीन ते चार तास वीज गायब झाल्याने व जनरेटरमध्येही बिघाड झाल्याने ऑक्सिजन सुरू असणाऱ्या रुग्णांची मात्र पुरती गैरसोय झाली. याशिवाय येथे व्हेंटिंलेटर नाही, की रेमडेसिविर इंजेक्शनचा पत्ता नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांची सेवा रामभरोसे सुरू असल्याचा आरोप रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून केला जात आहे.पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत. आरोग्य प्रशासनाने यासाठी विभागवार कोविड सेंटर उभारली आहेत. वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा या तालुक्यांसाठी वाड्यातील पोशेरी येथे आणि विक्रमगड येथील रिव्हेरा येथे, अशी दोन कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. रिव्हेरा हे सुसज्ज सेंटर असून, येथे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, पोशेरी येथील कोविड सेंटरवर असुविधाच खूप आहेत.या सेंटरमध्ये व्हेंटिलेटर, तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचा पत्ताच नाही. या रुग्णालयात रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात अन्‌ रुग्णांची प्रकृती खालावली, तर त्याला पुढे रिव्हेरा येथे हलविण्यात येते.पोशेरी येथे एकूण १९८ रुग्ण उपचार घेत असून, बुधवारी रात्रीच्या सुमारास या सेंटरमध्ये वीज गायब झाली ती पुन्हा तीन ते चार तासांनी आली. त्यातच येथील जनरेटरमध्येही बिघाड झाल्याने आधीच उकाडा, त्यात वीज गायब झाल्याने रुग्णांची झोपच उडाली. ज्या रुग्णांना ऑक्सिजन लावले होते, त्यांची पुरती गैरसोय झाली. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांनी रुग्णालयासमोरच ठिय्या आंदोलन करून असुविधांचा जाब प्रशासनाला विचारला. यावेळी उपस्थित डाॅक्टरांची भंबेरी उडाली होती. पालघर ग्रामीणमधील कोविड रुग्णांची आरोग्यसेवा रामभरोसे सुरू असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आदिवासी गोरगरीब रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या प्रशासन व सरकारने या रुग्णालयात सोयी-सुविधा वेळीच पुरवल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी दिला आहे.

पोशेरी येथे कोविड सेंटरमध्ये एमबीबीएस डाॅक्टर नसल्याने येथे रेमडेसिविर इंजेक्शन देता येत नाही.-डाॅ. संजय बुरपल्ले, तालुका आरोग्य अधिकारी, वाडा

बुधवारी रात्री येथील जनरेटरमध्ये बिघाड झाल्याने व वीज गायब झाल्याने काही तास वीज गायब झाली. त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली.-डाॅ. सुनील भडांगे, वैद्यकीय अधीक्षक, वाडा

या कोविड सेंटरमध्ये दोन विभाग आहेत. येथे किमान दररोज शेकडो रुग्ण येत असतात. परंतु स्वच्छतेचा अभाव आहे. शौचालयाची अत्यंत दुरवस्था आहे. एक दिवस पाणीच नव्हते तर काल दोन तास वीज नव्हती. ऑक्सिजनची सुविधा नाही. १४० रुग्णांवर एकच डाॅक्टर उपचार करतात. त्यामुळे येथील परिस्थितीला कंटाळून येथे उपचार घेत असलेले रुग्ण येथून  निघून जात आहेत. - एक रुग्ण, पोशेरी कोविड सेंटर

टॅग्स :hospitalहॉस्पिटल