शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनामुळे यंदा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:08 IST

कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर गर्दी, समूह टाळावाच लागेल, हे लक्षात घेत दहीहंडीचा उत्सव साजरा न करण्याचे महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीने ठरवले आहे.

स्रेहा पावसकरठाणे : राज्यात गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले जात आहे. सोबतच दहीहंडी उत्सव साजरा न करण्याची गोविंदा पथकांची मानसिकता दिसत आहे. मोठ्या समूहाशिवाय दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकत नाही आणि कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर गर्दी, समूह टाळावाच लागेल, हे लक्षात घेत दहीहंडीचा उत्सव साजरा न करण्याचे महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीने ठरवले आहे.गणेशोत्सवाइतकाच महत्त्वाचा दुसरा सण म्हणजे दहीहंडी. दहीहंडी उत्सवासाठी अनेक गोविंदा पथके साधारण महिनाभर आधीपासून सराव सुरु करतात. दुसरीकडे आयोजकही मोठ्या प्रमाणात आयोजन करुन थरांसाठी बक्षिसे जाहीर करतात. गेल्या काही वर्षात ठाण्यात तर लाखोंच्या हंड्या उभारल्या जाऊ लागल्या आणि त्या फोडून लाखमोलाचे लोणी खाण्यासाठी गोविंदा पथके सकाळीच ठाण्यात दाखल होत होती.ठिकठिकाणच्या हंड्या फोडण्यासाठी आणि बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. मात्र यंदा कोरोनामुळे समूह एकत्र येईल अशा कार्यक्रमांना बंदी आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे. अशातच गर्दीशिवाय हा उत्सव होऊच शकत नाही, हे लक्षात घेत गोविंदा पथकांनी यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याची भूमिका घेतलेली आहे. ठाणे, मुंबई, नवीमुंबई, पालघर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, मीराभार्इंदर अशा शहरात मिळून जवळपास ८००-९०० गोविंदा पथके आहेत. या सर्वच पथकांनी उत्सव न करण्याचे ठरवले असून तसे समन्वय समितीला कळवले आहे.यानुसार समितीनेही उत्सव रद्द करण्याचे ठरवले आहे. केवळ कृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशी रात्री कृष्णजन्मसोहळा अगदी मोजक्या माणसांमध्ये आणि सोशल डिस्टन्स ठेवत करावा असे समितीने सर्व पथकांना कळवले आहे.>गर्दी आणि समूहाशिवाय दहीहंडी उत्सव साजरा होऊच शकत नाही आणि कोरोनाचा संसर्ग वाढत असताना हा उत्सव कोणीही साजरा करूच शकत नाही. आम्ही गोविंदा पथकांकडून याबाबत मत मागविले होते आणि जवळपास सर्व मंडळांनी यंदा उत्सव साजरा न करण्याची भूमिका मांडली आहे. त्यानुसार, केवळ कृष्णजन्मोत्सव सोशल डिस्टन्स ठेवत साजरा करण्याचे आम्ही त्यांना सुचविले आहे आणि दहीहंडी उत्सव रद्द करणार आहे. येत्या दोन दिवसांत तसे अधिकृतरीत्या जाहीर केले जाणार आहे.- समीर पेंढारे, उपाध्यक्ष,महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समिती