शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कारवाईच्या बडग्यानंतरही नागरिकांचा निष्काळजीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 00:04 IST

मास्क न लावण्याकडे कल : १४ लाख ५२ हजारांचा दंड वसूल

कल्याण : सद्य:स्थितीला अनलॉकमध्ये सर्वच ठिकाणी बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू झाले असताना सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चेहऱ्यावर मास्क, रूमाल, कापड परिधान करणे बंधनकारक केले आहे. पण, बहुतांश ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे केडीएमसीच्या दैनंदिन कारवाईवरून स्पष्ट होत आहे. १४ दिवसांत तब्बल दोन हजार ९०५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण १४ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शनिवारपर्यंत ही रुग्णसंख्या ४३ हजारांहून अधिक झाली आहे. ३८ हजार ८७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असले, तरी कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी आतापर्यंत ८४४ जणांचा मृत्यू ओढवला आहे. सध्याच्या अनलॉकमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत असून त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. सोशल डिस्टन्सचेही तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या अनलॉकमध्ये जूनमध्ये आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी परिपत्रक काढून दुकानदार आणि नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना केल्या आहेत.तसेच मास्क वापरण्यासंदर्भातल्या राज्य सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी महापालिका क्षेत्रातील दहाही प्रभागांत प्रभागक्षेत्र अधिकारी यांचे पथक आणि पोलिसांच्या सहकार्याने कारवाई सुरू आहे. जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहºयावर मास्क, रूमाल, कापड परिधान करणार नाहीत, अशांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. एप्रिल ते ९ सप्टेंबरपर्यंत प्रशासनाने केलेल्या कारवाईत पाच लाखांचा दंड वसूल केला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या