शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे आणखी एक हजार ७०० रुग्ण दाखल: ३५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 01:31 IST

ठाणे जिल्हयात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ झाली असली तरी रविवारच्या तुलनेत सोमवारी ती काही अंशी कमी झाली. रविवारी जिल्हयात दोन हजार १५० नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली होती. तर ५४ जणांचा मृत्यू झाला होता. याऊलट, सोमवारी मात्र, २४ तासांमध्ये जिल्ह्यात एक हजार ७०० रुग्ण दाखल झाले. तर ३५ जणांचा मृत्यू झाला. रुग्ण नव्याने दाखल होण्याचे प्रमाण आणि मृत्यू दरही काही अंशी घटल्याचे या आकडेवारीवरुन पहायला मिळाले.

ठळक मुद्देजिल्हयात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढबाधितांची संख्या ५७ हजार चार तर मृतांची संख्या एक हजार ६५१ झाली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: जिल्ह्यातील बाधित रु ग्णांच्या संख्येत रविवारपेक्षा सोमवारी काहीअंशी कमी नोंद झाल्याचे आढळले आहे. सोमवारी जिल्ह्यात एक हजार ७०० रुग्ण दाखल झाले. तर कोरोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५७ हजार चार तर मृतांची संख्या एक हजार ६५१ इतकी झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात १३ जुलै रोजी देखिल सर्वाधिक ४२७ रु ग्णांसह नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी १३ हजार २४० इतकी बाधितांची तर, १९८ मृतांची संख्या झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ३३३ बाधितांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या १३ हजार ६७५ तर, मृतांची संख्या ५१५ वर पोहचली आहे. नवी मुंबई महापालिकेत २३३ नवे रुग्ण दाखल झाले. तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ६७८ तर मृतांची संख्या ३०५ वर पोहचली आहे. मीरा भार्इंदरमध्ये सोमवारी १७८ नव्या रुग्णांची तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ७४६ तर मृतांची संख्या १९९ वर पोहचली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात ४२ बाधितांची तर एकाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे भिवंडीत बाधितांची संख्या दोन हजार ८२४ तर, मृतांची संख्या १४७ वर पोहोचली. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातही २२५ रु ग्ण नव्याने दाखल झाले असून चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ४२५ तर, मृतांची संख्या ७१ वर पोहचली आहे. अंबरनाथमध्ये ५१ रु ग्णांची नोंद झाल्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या दोन हजार ७२५ झाली. तर बदलापूरमध्ये ८४ रु ग्ण नव्याने दाखल झाले. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार ४७७ झाली. तसेच ठाणे ग्रामीण भागात १२७रु ग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार २१४ तर मृतांची संख्या ८१ वर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्य