शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

CoronaVirus News: ‘अ‍ॅण्टीजेन’ला नकार देणाऱ्या डॉक्टरांविरोधात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 00:55 IST

केडीएमसी आयुक्तांचे आदेश; आरोग्य खात्याची माहिती

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना रुग्ण हुडकून काढण्याकरिता व पर्यायाने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याकरिता सुरू केलेल्या अ‍ॅण्टीजेन टेस्ट करण्यास नकार देणाºया खासगी डॉक्टरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.जे खासगी डॉक्टर अ‍ॅण्टीजेन टेस्टला नकार देतील, त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.त्या म्हणाल्या की, महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या जुलै महिन्यात वाढली होती. कोरोना रुग्णांच्या टेस्टिंगसाठी केवळ सहा स्वॅब टेस्टिंग सेंटर होते. तसेच कोरोना टेस्टिंग लॅब गौरीपाड्यात सुरू झालेली नव्हती. कोरोना रुग्णाला कोरोना झाला आहे, हे तातडीने समजावे, यासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यात १० हजार अ‍ॅण्टीजेन टेस्ट किटची खरेदी केली. महापालिकेने कोरोना रुग्ण शोध मोहिमेंतर्गत अ‍ॅण्टीजेन टेस्टला सुरुवात केली आहे. या टेस्टचा सकारात्मक परिमाण दिसून येत आहे. टेस्टचा रिपोर्ट लगेच उपलब्ध होत असल्याने रुग्णावर उपचार सुरू करणे शक्य होत आहे. अ‍ॅण्टीजेन टेस्ट मोफत केली जाते व त्याचे किट खाजगी डॉक्टरांना पुरविले जाते.मात्र, काही खाजगी डॉक्टर ताप आलेल्या रुग्णांच्या सगळ्या प्रकारच्या टेस्ट करतात. त्यात डेंग्यू, मलेरिया, रक्तचाचणी, छातीचे सीटी स्कॅन करतात.मात्र, अ‍ॅण्टीजेन टेस्ट करीत नाहीत. रुग्णाची कोविड टेस्ट न केल्याने त्याला गंभीर स्वरूपाचा त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. त्याला कोविड रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याची कोविड टेस्ट करणे गरजेचे असते.मात्र, त्याची कोविड टेस्ट झालेली नसल्याने अशा रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असतानाही कोविड रुग्णालयात दाखल करता येत नाही. अनेक खाजगी डॉक्टर रुग्णाला न्यूमोनिया झाला आहे, असे समजून न्यूमोनियाचे उपचार करतात. त्यामुळे रुग्णाची प्रकृती खालावते. प्रसंगी त्याचा मृत्यू होतो. परिणामी, कोरोनाचा मृत्युदर वाढतो. ही बाब गंभीर असल्याने खाजगी डॉक्टरांविरोधात महापालिकेकडून साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे.केवळ टेस्ट करणे गरजेचेमहापालिका हद्दीत आतापर्यंत सात हजार ९८९ जणांची कोविड अ‍ॅण्टीजेन टेस्ट केली आहे. मनपाकडे आजमितीस २८ हजार अ‍ॅण्टीजेन टेस्ट किट उपलब्ध आहेत. तसेच स्वॅब टेस्टचे १३ हजार किट महापालिकेकडे उपलब्ध आहेत. महापालिका हद्दीत स्वॅब घेऊन ४८ हजार जणांची टेस्ट केली आहे.महापालिका हद्दीत आतापर्यंत कोरोनाचे २२ हजार १५५ रुग्ण आढळून आले. १७ हजार ४० जण बरे झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या चार हजार ६८४ आहे. रुग्णदुपटीचा दर हा ५३ दिवसांचा आहे, तर मृत्युदर १.८ टक्के आहे. अन्य महापालिकांच्या तुलनेत हा मृत्युदर कमी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkdmcकल्याण डोंबिवली महापालिका