शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

CoronaVirus News : ठाण्यात १७ दिवसांत कोरोनाचे ५७६४ रुग्ण; माजिवडा-मानपाडा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 03:45 IST

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही महापालिकेला यात फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही ठाणेकरांकडून होत नसल्याचे दिसत आहे.

ठाणे : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना ठाण्यात मागील १७ दिवसांत पाच हजार ७६४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात हॉटस्पॉट ठरलेल्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत या कालावधीत सर्वाधिक १३४९ रुग्ण आढळले आहेत. शहरात या काळात ७९ जणांचा मृत्यू झाला असून रिकव्हरी रेट पाच टक्क्यांनी घसरला आहे.कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही महापालिकेला यात फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही ठाणेकरांकडून होत नसल्याचे दिसत आहे. आजही शहराच्या अनेक भागांत मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. तोंडाला मास्क लावा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे आवाहन पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. परंतु, तरीही त्याकडे कानाडोळा होताना दिसत आहे. ठाणे परिवहन सेवेच्या बसमध्ये गर्दी दिसत आहे.परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे; किंबहुना जे परराज्यातून येत आहेत, त्यामुळेच आता कोरोनाच्या नव्या रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. एकूणच यामुळे आता सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आॅगस्ट अखेरपर्यंत महापालिका हद्दीत प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १७४५ एवढी होती. त्यात आता १७ दिवसांत १९३४ रुग्णांची भर पडली असून आजघडीला प्रत्यक्ष उपचार घेणाºयांची संख्या ३६७९ एवढी झाली आहे. तर आॅगस्ट अखेरपर्यंत शहरात ८३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तो आकडा ९१८ वर गेला असून या कालावधीत ७९ जणांचे मृत्यूझाले आहेत.रिकव्हरी रेट घसरला ८५ टक्क्यांवरगेल्या १७ दिवसांत महापालिका हद्दीत पाच हजार ७६४ नव्या रुग्णांची भर पडली असून याच कालावधीत तीन हजार ७५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट हा ९० टक्क्यांवरून आता ८५ टक्क्यांवर आला आहे. त्यातही माजिवडा मानपाडा या प्रभाग समितीत रोजच्या रोज ५० ते १०० रुग्ण आढळत आहेत. दिवसेंदिवस ही चितेंची बाब ठरत आहे. त्याखालोखाल नौपाडा प्रभाग समितीतही रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे