शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

CoronaVirus News: दिवसभरात ठाणे जिल्ह्यात २१ व्यक्तींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:50 IST

७७२ जणांना कोरोनाची लागण; नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोना बाधितांच्या संख्येत ७७२ ने वाढ झाली. २१ जणांचा मृत्यू झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १५ हजार १७५ तर, मृतांची संख्या ४९३ झाली आहे. शनिवारी नवी मुंबई महापालिकेत सर्वाधिक १९१ रुग्णांची तर, पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली.नवी मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ३ हजार ७३४ तर, मृतांची संख्या ११४ झाली आहे. ठाणे महापालिका हद्दीत शनिवारी १७६ बाधितांची नोंद झाल्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ५ हजार ००५ वर पोहोचली आहे. दिवसभरात पाचजणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या १५३ झाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये नव्या १६० रुग्णांची तर, दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची एकूण संख्या २ हजार ०७१ तर, मृतांची संख्या ५७ झाली आहे. भिवंडी महापालिका हद्दीत नव्या ३८ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांची संख्या ४७० झाली आहे. उल्हासनगर १४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७४२ झाली. अंबरनाथमध्ये ४८ नव्या रुग्णांसह बाधितांची संख्या ६१७ च्या घरात पोहोचली. बदलापूरमध्ये १४ रुग्णांची नोंद झाली.डबलसीट दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगाठाणे : सोशल डिस्टन्सचे नियम पायदळी तुडवत डबल आणि ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी आणि शनिवारी कल्याण-अंबरनाथ महामार्गावर आणि उल्हासनगर शहरात कारवाईचा बडगा उगारला. कोरोनाच्या या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहे. मात्र, लॉकडाऊ नचे नियम शिथिल होताच दुचाकीस्वार डबल, ट्रिपल सीट घेऊ न फेरफटका मारत आहेत. या बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करत वाहतूक पोलिसांनी दंडवसुली करण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयात जात असल्याचा बाहाणा करणाऱ्यांना डॉक्टरांची फाइल किंवा काहीतरी पुरावा मागितला जात असल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडत आहे.दुचाकीवरून दोघे, तिघे प्रवास करत असल्यामुळे त्यांच्यापासून संसर्ग फैलावण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दुचाकीस्वारांवर लक्ष केंद्रित केले आहे.भिवंडीत ३५० बेडच्या रुग्णालयाला मान्यताभिवंडी : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयावर ताण येत आहे. त्यातच उपचाराअभावी अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.या सर्व बाबींची दखल घेत महापौर प्रतिभा पाटील यांनी भिवंडीत कोरोना रुग्णालयासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकाºयांकडे मागणी केली होती.रुग्णसंख्या वाढत असल्याने ३५० बेडच्या रुग्णालयाला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. शहरातील पोगाव येथे ४० हजार चौरस फुटाच्या गोदामामध्ये रुग्णालय तयार केले जाणार आहे.लक्षणे नसलेल्यांनाही विलगीकरण कक्षातअंबरनाथ : अंबरनाथमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डेंटल कॉलेजमधील रुग्णालयाची शुक्रवारी पाहणी केली. तर दुसरीकडे बाधित कोरोनाग्रस्ताच्या नातेवाईकांना घरात विलगीकरण न करता पालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळत नाहीत अशा रुग्णांना घरातच विलगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या