शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४२२ नवे रुग्ण सापडले; ३८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 21:26 IST

ठाणे शहरात ३९८ रुग्ण आज आढळून आले आहेत. आता या शहरात ४० हजार ४९२ बाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे: जिल्ह्यात शनिवारीही एक हजार ४२२ रुग्ण नव्याने सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ९० हजार ४८३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आज ३८ मृत्यू झाल्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ८१६ झाली आहे.  ठाणे शहरात ३९८ रुग्ण आज आढळून आले आहेत. आता या शहरात ४० हजार ४९२ बाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत एक हजार ६१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात ३३४ रुग्णांची वाढ झाली असून सहा मृत्यू आज झाले आहेत. या शहरात आतापर्यंत ४५ हजार ८७६ बाधीत झाले. तर, आजपर्यंत ८९५ मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

उल्हासनगर महापालिका परिसरात ३० बाधितांसह एकाच्या मृत्यू ची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधीत रुग्ण नऊ हजार ५९९ झाले आहे. तरी, आजपर्यंत ३१५ मृत्यू झाले आहेत. भिवंडीला आज ३३ बधीत आढळून आले असून  एकाचा ही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार ३९३ असून मृतांची संख्या ३२२ आहे. मीरा भाईंदरमध्ये १३९ रुग्णांची तर, सहा मृत्यूची नोंद केली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या २० हजार २७६ झाली असून मृतांची संख्या ६२९ वर गेली आहे. 

अंबरनाथमध्ये ३६ रुग्णांची नव्याने वाढ. तर, आज एकाचा मृत्यू झाला आहे. आत बाधितांची संख्या सहा हजार ७२७ झाली आहे. तर, मृतांची संख्या २४१ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत सहा हजार ६६६ झाली आहे. या शहरात आजही मृत्यू नाही. आतापर्यंत ७७ ही मृत्यूची संख्या कायम आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात ११६ रुग्णांची वाढ झाली आणि दहा मृत्यू झाले आहेत. आता बाधीत १५ हजार ३३८ आणि मृत्यू ४६५ झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे