शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

CoronaVirus News: ठाणे महापालिका हद्दीत 127 मायक्रो कंटेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:05 IST

काेराेनासंबंधी उपाययाेजना : माजिवडा-मानपाडा समितीत सर्वाधिक

ठाणे : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठामपाने मागील महिन्यापासून मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, आता या झोनमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. सर्वाधिक मायक्रो कंटेन्मेंट झोन माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत आहेत. विशेष म्हणजे, याच भागात मागील महिन्यापासून सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. सध्या या भागात एक हजार २४० सक्रिय रुग्ण असून शहरात १२७ मायक्रो कंटेन्मेंट झोन असून, त्यातील ४९ झोन हे केवळ माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत आहेत. ठामपा हद्दीत आतापर्यंत ८५ हजार ४०६ कोरोनाबाधित आढळले आहेत. पैकी ७१ हजार ६७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, हे प्रमाण ८४ टक्के आहे.  तर, एक हजार ४१३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या शहरात १२ हजार ३१४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू  आहेत. त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण घरीच, तर  उर्वरित रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरात सध्या दररोज १५००च्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यातही रोजच्या रोज एकट्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत ५००च्या आसपास रुग्ण आढळत आहेत.  पाचपेक्षा जास्त रुग्णांचा निकषकोरोनाच्या विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या इमारती तसेच परिसरांना मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या आदेशानुसार प्रशासनाने शहरातील १२७ मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. या इमारती व परिसरातील नागरिकांमुळे शहराच्या दुसऱ्या भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी ही उपाययोजना केली जात आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोनवर दृष्टिक्षेप प्रभाग समिती     मायक्रो      रुग्णसंख्या        कंटेन्मेंट झोनमाजिवाडा-मानपाडा     ४९      १२४० उथळसर     १४     १२४ दिवा     ४      ३५ नौपाडा-कोपरी     २२     ६५ वागळे इस्टेट     ४      ३१ कळवा     ३     —लोकमान्य-सावरकर    ११     १४३ वर्तकनगर      २०     ७७८ मुंब्रा     —    —एकूण     १२७     २४३४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या