शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२०७ नवे रुग्ण, २९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 21:01 IST

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे २०२ रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात २२ हजार ४ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज अवघे तीन जणांचा मृत्यू झालेला आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार २०७ रुग्णांची रविवारी वाढ झाली. त्यामुळे आज जिल्ह्यातील रुग्ण संंख्या ९८हजार १६७ झाली आहे. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता दोन हजार ७४७ झाली आहे.  ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे २०२ रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात २२ हजार ४ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज अवघे तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत ६९५  जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात २९७ रुग्णांची आज वाढ झाली. तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत २२ हजार ४५२ रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या ४४० झाली आहे. 

नवी मुंबई महापालिकेत ३२३ रुग्णांची तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या १८ हजार ४८१ झाली आहे. तर, मृतांची संख्या ४६९ झाली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात आज तीन मृत्यू झाला आहे.  तर 23 नवे रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत मृतांची संख्या १५७ तर सात हजार १३७ बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. 

भिवंडी महापालिका क्षेत्रात आज २३ बधीत आढळून आले. तर आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आता बाधितांची संख्या तीन हजार ७७९ झाली आहे. तर आजपर्यंत मृतांची संख्या २५८ आहे. मीरा भाईंदरमध्ये आज १६४ रुग्णांची तर, एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या नऊ हजार ५८३ झाली, तर, मृतांची संख्या ३१३ झाली आहे. 

अंबरनाथमध्ये आज ६६ रुग्णांची वाढ तर, एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आज बाधितांची संख्या चार हजार २४८ झाली. तर, मृतांची संख्या १६६ आहे. बदलापूरमध्ये ५४ रुग्णांची आज नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ६७ झाली. या शहरात आजही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या ५१ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात ४६ रुग्णांची वाढ झाली. आज चार मृत्यू झाले आहेत. आता बाधितांची संख्या सात हजार ४१६ आणि मृतांची संख्या १९८ झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस