शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कळवा, सिव्हिल हॉस्पिटलच्या चुकीमुळे गर्भवतीला मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:49 IST

भोंगळ कारभार चव्हाट्यावर; दुसऱ्याच महिलेचा रिपोर्ट पाठवला पुढे; आडनावातील साधर्म्यामुळे झाली चूक

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व सिव्हिल हॉस्पिटलच्या गोंधळामुळे एका नऊ महिन्यांच्या गर्भवतीला मनस्ताप सहन करावा लागला आहे. कळवा रुग्णालयाने ११ जूनला या महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला. त्यानंतर तिला सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड कक्षात ठेवले. मात्र, तिचे सीझर करणे आवश्यक असल्यामुळे तिला मुंबईतील नायर रुग्णालयात पाठवले. तेथे सिव्हिलने पाठवलेला रिपोर्ट या महिलेचा नसल्याचे उघड झाले. केवळ आडनावातील साधर्म्यामुळे चुकीचा रिपोर्ट पाठवल्याची कबुली सिव्हिल रुग्णालयाने दिली आहे.निगेटिव्ह असताना केवळ कळवा हॉस्पिटलच्या चुकीच्या रिपोर्टमुळे या महिलेला सिव्हिलच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिला लागण झाल्याचा आरोप या महिलेच्या पतीने केला आहे. हे सर्व प्रकरण सावरण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. तर सिव्हिल हॉस्पिटलने दुसºया महिलेचा दिला असल्याची कबुली दिली आहे. तसेच ही महिला पॉझिटिव्हच होती, असा खुलासा पालिका प्रशासनाने केला आहे. केवळ सिव्हिलच्या गफलतीमुळे हा प्रकार घडल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.कशेळीतील ३४ वर्षीय महिलेला दिवस पूर्ण झाल्यामुळे बाळकूमच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. कोविडची टेस्ट करण्यासाठी तिला कळवा हॉस्पिटलला पाठवले. तिचा रिपोर्ट आल्यानंतर रुग्णालयांतील भोंगळ कारभारामुळे कळवा हॉस्पिटल ते सिव्हिल आणि नंतर नायर हॉस्पिटल असा प्रवास तिला एकटीला करावा लागला. ठाण्यातील मंगेश जोशी यांनी मुंबईत जाऊन तिला आधार देत पुन्हा ठाण्यात आणले. सोशल मीडियावरून हा सर्व प्रकार त्यांनी उघड करताच मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कळवा रुग्णालय गाठून या महिलेला दाखल करून घेतले. ही महिला कशेळीत राहणारी असून जिचा रिपोर्ट या महिलेला देण्यात आला होती, ती पॉझिटिव्ह महिला वाशी येथे राहणारी आहे. संध्यकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत काहीही दोष नसताना वणवण करावी लागल्यामुळे तिच्या डोळ्यांत पाणी आले. यापूर्वी चुकीचा रिपोर्ट देणाºया एका खाजगी लॅबवर ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे; मात्र आता पालिकेच्याच लॅबने चुकीचा रिपोर्ट दिल्याने संबंधित व्यक्तींवर कडक कारवाईची मागणी जाधव यांनी केली आहे.‘रुग्णालयाच्या चुकीमुळे माझी पत्नी कोरोना पॉझिटिव्ह’कळवा रुग्णालयात ९ जूनला टेस्ट केल्यानंतर ११ जूनला ती पॉझिटिव्ह असल्याचा आम्हाला फोन आला. मात्र, रिपोर्ट दिला नाही. सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या पत्नीला नेल्यानंतर तिला तेथून नायर हॉस्पिटलला एकटीला पाठवले. नायर रुग्णालयाने हा रिपोर्ट मागितल्यानंतर हा रिपोर्ट दुसऱ्या महिलेचा होता. केवळ आडनाव समान होते, हे स्पष्ट झाले. मात्र, पॉझिटिव्ह समजून एक दिवस सिव्हिलच्या कोविड कक्षात पत्नीला ठेवले आणि तिथे निगेटिव्ह असताना तिला कोरोनाची लागण झाल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे.अतिशय गंभीर हा प्रकार असून याची दखल स्वत: महापालिका आयुक्तांनी घेतली पाहिजे. जो कोणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या