शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

CoronaVirus: अवघ्या चार दिवसांत भाज्यांचे दर कडाडले; मार्केटमध्ये गर्दी, ग्राहकांच्या खिशाला मात्र चाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 13:34 IST

तर इतर भाज्यांचे भावही दुप्पट, तिप्पट झाल्याचे दिसून आले आहे. असे असताना नागरिक मात्र पुढील 10 दिवस पुरेल एवढी भाजी खरेदी करीत होते.

ठाणे  : अनलॉक दोन जाहीर झाल्यानंतर ठाणे महापालिकेने मात्र संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी भाजी मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु यावेळी भाजीचे दर अचानक कडाडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 20 रुपयांची कोथिंबिरीची जुडी 80 रुपये झाल्याचे दिसून आले. तर इतर भाज्यांचे भावही दुप्पट, तिप्पट झाल्याचे दिसून आले आहे. असे असताना नागरिक मात्र पुढील 10 दिवस पुरेल एवढी भाजी खरेदी करीत होते.तर ट्रान्सपोर्ट आणि हमालांचे दर वाढल्यानेच भाजीचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परंतु पुढील 10 दिवस लॉकडाऊन असल्याने विक्रेते हे ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. पुढील 10 दिवस संपूर्ण ठाणे  शहर लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे बुधवारी ठाणेकर नागरिकांनी पुन्हा एकदा जांभळी नाका येथील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. परंतु भाज्यांचे वाढलेले दर पाहून त्यांची आज झोपच उडाल्याचे दिसून आली. प्रत्येक भाजीचे दर हे दुप्पट, तिप्पट झाल्याने ग्राहक हवालदिल झाल्याचे दिसत होते. आधीच तीन महिन्यांनंतर कामाला कुठे सुरुवात झाली होती, पगार कमी झाले आहेत, काहींच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. अशातच आता विविध वस्तुंच्या वाढत्या दरांमुळे नागरीक हैराण झाले आहे. चार दिवसापूर्वी भाजी खरेदी करताना 20 रुपये असलेले दर 40 ते 80च्या घरात गेलेच कसे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आधीच खाण्याचे आबाळ सुरू असताना आता भाज्याही कडाडल्या तर खायचे काय, जगायचे कसे असा सवाल नागरिक करीत आहेत.भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत, सर्वच भाज्यांचे दर वाढलेले आहेत, व्यापाऱ्यांवर कोणाचे कंट्रोल नाही, शासनाकडे वाढणा:या दरांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे त्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.(प्रकाश ताम्हाणे  - ग्राहक, ठाणेकर)रोजपेक्षा जास्तीचे दर आकारले जात आहेत, गुरुवार पासून बंद ठेवण्यात येणार असल्यानेच विक्रेते लुट करीत आहेत. परंतु त्याकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही.(प्रतिभा माने - गृहिणी, ठाणेकर)पुढील 10 दिवस लॉकडाऊन होणार म्हणून आम्ही भाज्यांचे दर वाढवलेले नाहीत. उलट ट्रान्सपोर्ट आणि हमालांचे दर हे दुप्पट, तिप्पट झाल्यानेच आम्हाला नाईलाज आहे. त्यामुळेच भाज्यांचे दर वाढलेले आहेत.(भाजी विक्रेते - जांभळीनाका मार्केट)आजचे भाज्यांचे दरभाजी                           पूर्वी         आताकोबी                      30 रुपये   50 रुपयेशिमला मिर्ची            50          80टॉमेटो                    30          80भेंडी                      40          60गवार                     60          80कोथिंबीर                20          80शेपु                       30         40काकडी                 20         40मेथी                      20         40पालक                   10         20