शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

Coronavirus : उल्हासनगरात एका महिलेला संसर्ग, कुटुंबासह सहकाऱ्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 6:14 AM

उल्हासनगरातील ४९ वर्षीय महिला पाच जणांसह दुबईला गेली होती. ४ मार्च रोजी परत आल्यानंतर सर्दी, खोकला, ताप आदी त्रास झाल्याने तिने ओळखीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने १७ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेतले असता, कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले.

उल्हासनगर : दुबईहून कुटुंबासह आलेल्या ४९ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे उघड झाले आहे. खबरदारी म्हणून महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने या महिलेसोबत आलेल्या पाच जणांसह, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचाही शोध सुरू केला आहे. त्यापैकी काही जणांना मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी पाठविल्याची माहिती आयुक्तांनी गुरुवारी दिली.उल्हासनगरातील ४९ वर्षीय महिला पाच जणांसह दुबईला गेली होती. ४ मार्च रोजी परत आल्यानंतर सर्दी, खोकला, ताप आदी त्रास झाल्याने तिने ओळखीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने १७ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेतले असता, कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली. महिलेसोबत पाच जण दुबईला गेले होते. त्यांच्यासह त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांचाही शोध पालिकेचे पथक करीत असून, त्यापैकी काही जणांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला की नाही, हे अहवालानंतर उघड होणार आहे.देशातील सर्वाधिक घनतेचे शहर म्हणून उल्हासनगर प्रसिद्ध असून, येथून परदेशी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेचे वास्तव्य असलेल्या परिसरात वैद्यकीय पथक तैनात केले असून, या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. दुबईहून आलेल्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध महापालिका पथक घेत असून, १२ पेक्षा जास्त जणांचे त्यांच्या घरातच विलगीकरण केल्याचे उघड झाले आहे. गेल्या आठवड्यात दुबईहून परतलेल्यांची संख्या मोठी असून, महापालिकेने त्यांना घरातच थांबवल्याची माहिती आयुक्तांनी दिली.दोन विलगीकरण कक्ष तयारउल्हासनगर पूर्व आणि पश्चिमेला दोन विलगीकरण कक्षांची स्थापना महापालिकेने केली. २४ तास डॉक्टर पथक, सफाई कामगार व सुरक्षारक्षक या कक्षांमध्ये तैनात असून रुग्णांना दोन्ही वेळचे जेवण, टीव्ही, इंटरनेट सेवा आदी साधने उपलब्ध करून दिली आहेत. ज्यांना विलगीकरण कक्षात राहायचे नाही, त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या राहत्या घरातील एका खोलीत राहता येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस