शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: उल्हासनगरात कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या ९ जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 14:45 IST

तसाच प्रकार दोन दिवसापूर्वी पुन्हा घडल्याने शहर प्रशासनाचे धिंडवडे निघाले आहे. संच्युरी रुग्णालयात एका कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला.

सदानंद नाईक  उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयाची आदेश धुडकावून संशयीत कोरोना रुग्णाच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या पैकी 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.याप्रकरणी खन्ना कंपाऊन परिसरात खळबळ उडाली असून अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या पैकी अनेकजण मोकाट असल्याचे बोलले जात आहे. 

उल्हासनगर खन्ना कंपाऊंड येथील एका जणाचा गेल्या शनिवारी मध्यवर्ती रुग्णालयात मुत्यु झाला. डॉक्टरांनी त्याला कोरोना संशयीत घोषीत करून बांधलेला मुतदेह उघडू नका. या अटीवर मुतदेह कुटुंबाच्या अंत्यसंस्कार साठी ताब्यात दिला. मात्र कुटुंबांनी मुतदेह घरी नेवून उघडून अंत्ययात्रा काढली. दुसऱ्या दिवसी मृत झालेल्या इसमाचा कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. महापालिका आरोग्य विभागाने कुटुंबासह अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या 70 पेक्षा जास्त नागरिकांना क्वारंटाईन केले. शुक्रवारी त्यांच्या स्वाब अहवालात तब्बल 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. महापालिकेने खन्ना कंपाऊंड परिसर सील केला असून पालिका व मध्यवर्ती रुग्णालयाच्या दिरंगाई मुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे टीका होत आहे. तसेच सबंधितावर कारवाईची मागणी सर्वस्तरातून होत केली जात आहे. 

तसाच प्रकार दोन दिवसापूर्वी पुन्हा घडल्याने शहर प्रशासनाचे धिंडवडे निघाले आहे. संच्युरी रुग्णालयात एका कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने कुटुंबाच्या ताब्यात मुतदेह देताना बांधलेला मुतदेह उघडू नका. सार्वजनिकरित्या अंत्ययात्रा काढू नका. असे सुचविले होते. मात्र तसे आले नसून संशयित मृत रुग्णाची अंत्ययात्रा काढल्याचे बोलले जाते. तसेच संशयित मृत रुग्णाचा कोरोना अहवाल शुक्रवारी पोझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. एकूणच शहरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून शुक्रवारी 10 रुग्ण कोरोना पोझिटीव्ह मिळाल्याने एकून कोरोना रुग्णाची संख्या 91 झाली आहे. त्यापैकी 5 जणाचा मुत्यू झाला असून 8 जण कोरोना मुक्त झाले. तर 78 जणांवर कोरोना रुग्णालयात उपचार सुरु आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस