शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

Coronavirus : कोरोनाच्या भीतीमुळे मॉलमधील वर्दळ घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 01:22 IST

ठाणे शहरातील मॉलमध्ये असलेले तसेच छोटे सिनेमागृह बंद झाल्याचे दिसून आले. त्यातही शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस असल्याने ठाण्यातील दोन मोठ्या मॉलमध्ये गर्दी होत होती. परंतु, या शनिवारी मात्र या मॉलमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले.

ठाणे - कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य शासनाने ठाणे, मुंबईतील सिनेमागृहे, जिम, जलतरणतलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, ठाणे शहरातील मॉलमध्ये असलेले तसेच छोटे सिनेमागृह बंद झाल्याचे दिसून आले. त्यातही शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस असल्याने ठाण्यातील दोन मोठ्या मॉलमध्ये गर्दी होत होती. परंतु, या शनिवारी मात्र या मॉलमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले. तर, जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून मॉलधारकांनी आपल्या सुरक्षारक्षकांना मास्क देऊन स्वच्छतेबाबतही चोख पावले उचलल्याचे दिसून आले. मात्र, मेडिकलमध्येच सॅनिटायझरचा तुटवडा असल्याने मॉलमधील दुकानांच्या प्रवेशद्वारावर ते दिसले नाही.मध्यरात्रीपासून सिनेमागृहे बंद करण्याचे आदेश आल्यानंतर त्यानुसार त्या आदेशाचे पालन करून शहरातील सर्वच मॉलमधील सिनेमागृहांच्या बाहेर बंदचे फलक लावले आहेत. शहरातील छोटी सिनेमागृहेही बंद ठेवली होती. मॉलधारकांनी स्वच्छता तसेच नागरिकांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले होते. त्यानुसार, कॅडबरी, नितीन कंपनी व घोडबंदर येथील मॉलचालकांनी खबरदारी घेतल्याचे दिसले. कॅडबरीजवळील मॉलच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तसेच मॉलमधील प्रत्येक सुरक्षारक्षकांना मास्क बंधनकारक केले होते. तसेच वेळोवेळी फरशीची सफाईदेखील केली जात होती. स्वच्छतागृहांमध्येही साफसफाई आणि हॅण्डवॉश ठेवल्याचे दिसत होते.शहरातील मॉलमध्ये शनिवार आणि रविवार आला की, जशी गर्दी दिसत असते, तशी गर्दी या शनिवारी मात्र दिसली नाही. यामध्ये जवळजवळ ५० टक्के घट झाल्याचे दिसले. सध्या जे कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर घोंगावत आहे, त्यातून सावरण्यासाठी आम्हीदेखील यात सहभागी असून त्याविरोधात लढा देण्यासाठी सज्ज असल्याचे मॉलधारकांनी सांगितले. त्यामुळे नफातोट्याचा विचार न करता या आजारावर मात कशी करता येईल, याचाच सध्या आम्ही विचार करत असल्याचेही स्पष्ट केले.सॅनिटायझरचा तुटवडामॉलमधील प्रत्येक शॉपमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र, असे असले तरी शहरात सॅनिटायझरचा तुटवडा असल्याने मॉलमधील अनेक शॉपमध्ये ते उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील अनेक मेडिकलमध्ये मागील तीन दिवसांपासून याची कमतरता आहे.महापौर जनसंवादही रद्दनरेश म्हस्के हे मागील तीन महिन्यांपासून महापौर जनसंवादाचे आयोजन करतात. त्याला गर्दीही होते. परंतु, कोरोनाचे सावट असल्याने खबरदारी म्हणून या महिन्यातील जनसंवाद रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली.विलगीकरण कक्षास विरोधठाणे : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी श्रीनगर येथे सुविधा भूखंडाच्या माध्यमातून बांधलेल्या पाच मजली इमारतीत २५ खाटांची व्यवस्था करण्याचा निर्णय शुक्रवारी संध्याकाळी तातडीने ठाणे महापालिकेने घेतला असला तरी तेथे रुग्णांना ठेवण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. भरवस्तीत ही इमारत असल्याने या ठिकाणी अशा प्रकारचे रुग्ण ठेवल्यास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार असल्याने शुक्रवारी रात्री उशिरा नागरिकांनीच या इमारतीचा ताबा घेतला. अखेर काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी प्रभारी पालिका आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्याशी चर्चा केल्यानंतर तेथे ही सुविधा करण्याचा निर्णय तूर्तास थांबवला असून, हा वॉर्ड मनोरुग्णालयात हलवण्याचा विचार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.श्रीनगर येथील या इमारतीत तीन मोठे हॉल आणि १२ स्वतंत्र रूम असून, या ठिकाणी शुक्र वारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भेट दिली. या इमारतीत ही तातडीची सुविधा निर्माण करण्याचा निर्णय शुक्र वारी संध्याकाळी घेण्यात आला होता. त्यादृष्टीने तेथे साफसफाई व इतर तयारीही केली होती. त्यामुळे रात्रीच तेथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामासाठी आल्याची बातमी स्थानिकांना समजली. त्यामुळे त्यांनी इमारती जवळ येऊन सफाईचे काम थांबवले. तसेच त्यांनी या इमारतींचा ताबा घेतल्याने पालिकेच्या यंत्रणेला काहीच काम करता आले नाही. अखेर मनोज शिंदे हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अहिवर तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय तूर्तास थांबवण्यात आला.एका रूममध्ये करणार होते एकाची सोयअद्याप यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नसला तरी या इमारतीत हा वॉर्डदेखील सुरू केला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या इमारतीमध्ये छोट्या छोट्या १२ रूम असून प्रत्येक रूममध्ये बाहेरून आलेल्या एका नागरिकाला स्वतंत्र ठेवण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.चित्रपटगृहे बंद करणे अनाकलनीयठाणे : कोरोनामुळे राज्यातील काही शहरांत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करून शाळा, कॉलेज, तरणतलाव आणि चित्रपटगृहे बंद केली आहेत. सरकारच्या या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र, मोठमोठे हॉटेल, बार व रेस्टॉंरंटमध्ये एकच ग्लास, प्लेट, चमचे वापरले जातात आणि हजारो लाखो एकाच ठिकाणी उठतात, बसतात, हात लावतात, अशा बार आणि रेस्टॉरंटवर ही बंदी लागू का नाही, असा सवाल मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक विजू माने यांनी केला आहे.राज्य शासनाच्या निर्णयानुसार शहरातील मॉलमधील सिनेमागृह, तसेच इतर छोटे सिनेमागृहही बंद केली आहेत. शासनाचा हा निर्णय योग्य आहे. मात्र, इतर गोष्टींकडेही माने यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मोठमोठ्या बार आणि रेस्टॉरंटमध्ये रोज शेकडो हजारोंच्या संख्येने नागरिक गर्दी करतात, अशा आस्थापनांवरही बंदी आणली पाहिजे होती. मात्र, त्यांना या निर्बंधातून का वगळले हे अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी जारी केलेल्या आदेशानंतर ठाण्यातील सिनेमागृह, तरणतलाव, जिम बंद केले; परंतु या बारच्या बाबतीतही योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे