शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
5
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
6
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
7
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
8
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
9
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
10
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
11
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
12
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
13
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
14
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
15
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
16
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
17
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
18
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
19
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
20
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

coronavirus: मध्य रेल्वेचे कोरोना वॉरियर्स; ड्रायव्हर्स आणि गार्ड्स संकटकाळात देताहेत अव्याहत सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 2:54 PM

 लॉकडाऊन दरम्यान मालवाहतूक गाड्या चालविण्यात लोको पायलट आणि गुड्स गार्ड्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ज्यामुळे देशाच्या एका कोप-यातून  देशाच्या दुसर्‍या कोप-यात आवश्यक वस्तू  पाठविणे शक्य होत आहे.

डोंबिवली - २३ मार्च २०२० पासून देशभरात लॉकडाऊन झाल्यापासून मध्य रेल्वे प्रत्येक बाबतीत   पुढाकार घेऊन कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराशी झुंज देत आहे. प्रवासी सेवा थांबविण्यात आल्या होत्या तरी  पुरवठा साखळी कायम ठेवण्यासाठी माल  व पार्सल वाहतूक सुरूच होते.  त्यानंतर रेल्वेने १२ मे पासून १५ जोड्या वातानुकूलित विशेष गाड्या सुरू केल्या आणि अनलॉक -१ च्या घोषणेसह, निवडक २०० विशेष गाड्या १ जूनपासून भारतात धावू लागल्या आहेत.  राज्य शासनाने निश्चित केलेल्या  अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी मध्य रेल्वे आपल्या उपनगरी भागात ३५२ विशेष लोकल गाड्या चालवित आहे.  या निवडक विशेष गाड्या, माल  / पार्सल गाड्या आणि उपनगरी गाड्या चालविण्यासाठी  मेल एक्स्पेसचे लोको पायलट / असिस्टंट लोको पायलट आणि गार्ड, घाट ड्रायव्हर्स, गुड्स ड्रायव्हर्स व गुड्स गार्ड, शंटर ड्रायव्हर व गार्ड, उपनगरी मोटरमन / मोटरवूमन व गार्ड महत्वाची भूमिका निभावत आहेत.

 घाट चालक  मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दोन घाट विभाग आहेत.  या घाट विभागात काम करणारे ड्रायव्हर्स खूपच कुशल आणि प्रशिक्षित आहेत.  दोन्ही घाटांत १:३७ चढाव (ग्रेडियंट) आहे जे भारतातील सर्वात उच्च ग्रेडियंट्सपैकी एक आहेत.

 १) कर्जत-लोणावळा दरम्यान दक्षिण पूर्व भोर घाट साधारणपणे २८ कि.मी. लांबीचा असून त्यात सुमारे ५२ बोगदे आणि ८ मोठे पूल आहेत. २) कसारा-इगतपुरी दरम्यानचा उत्तर पूर्व  थल घाट साधारणतः १४ कि.मी. लांबीचा असून त्यात सुमारे १८ बोगदे आणि ८ मोठे पूल आहेत.

 या दोन्ही घाटांवरील गाड्यांना बॅंकर्स जोडलेले आहेत जेणेकरून घाट चढणीच्या वेळी ट्रेनला ढकलता येते आणि घाटांवरून उतरताना ब्रेकर म्हणून काम करते.  त्यांची कामे  सर्वसाधारणपणे आव्हानात्मक असतात , विशेषत: पावसाळा आणि हिवाळा दरम्यान. 

 गुड्स लोको पायलट आणि गार्ड्स 

 गुड्स गाड्या चालविण्यामध्ये गुड्स लोको पायलट आणि गार्ड्स महत्त्वाची भूमिका बजावतात. देशातील वस्तूंचा पुरवठा स्थिर राहण्यासाठी,  मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागातून अनेक मालगाड्या चालवल्या जात आहेत.  मध्य रेल्वेला  जोडून असलेल्या  कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे, पश्चिम-मध्य रेल्वे,  दक्षिण-मध्य  रेल्वे, दक्षिणपूर्व- मध्य रेल्वे, दक्षिण- पश्चिम  रेल्वे इत्यादी विविध झोनमध्ये गुड्स लोको पायलट आणि गार्ड्सची अदलाबदल  करतात.  

 शंटर ड्रायव्हर्स आणि गार्ड्स  रेक्स तयार करणे,  दुरुस्तीयोग्य कोच / वाघिणीची जोडणी व वेगळे करणे, रॅक एका यार्डमधून दुसर्‍या यार्डमध्ये हलविण्यात शंटर्स खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत.

 प्रवासी  ट्रेनचे लोको पायलट आणि  गार्ड्स 

 या कोविड-१९ कालावधीत प्रवाशांची  एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी  मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातील लोको पायलट ह्या विशेष मेल/एक्सप्रेस ट्रेन चालविण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत.

 लॉकडाऊन दरम्यान मालवाहतूक गाड्या चालविण्यात लोको पायलट आणि गुड्स गार्ड्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ज्यामुळे देशाच्या एका कोप-यातून  देशाच्या दुसर्‍या कोप-यात आवश्यक वस्तू  पाठविणे शक्य होत आहे.

 उपनगरी मोटरमन / मोटर-वूमन आणि गार्ड्स: 

 राज्य शासनाने निश्चित केलेल्या  अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी मुंबई उपनगरी गाड्यांच्या मोटरमन,  मोटरवूमन आणि गार्ड्स,  उपनगरी भागात ३५२ विशेष गाड्या चालविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.  प्रत्येक फेरीनंतर  उपनगरी गाड्यांना स्वच्छ करण्याव्यतिरिक्त कोरोनाव्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी मोटरमन/गार्ड कॅब (cabin) देखील  नियमितपणे स्वच्छ केल्या जातात.

 देशसेवेसाठी पडद्यामागे असंख्य नायक काम करत आहेत.  हे कर्मचारी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे आणि सॅनिटायझर वापरणे यासारख्या निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतात.  याशिवाय  चेंज-ओव्हर पॉईंट्स येथे  प्रत्येक  वापरानंतर ट्रेनच्या इंजिन व तसेच रनिंग रूम इत्यादी ठिकाणी  सॅनिटायझ करीत आहेत. कोविड -१९ च्या संकटकाळात होत असलेल्या या उत्कृष्ट कार्याबद्दल आम्ही या सर्व कोरोना वॉरियर्सना सलाम करतो.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेMumbaiमुंबईthaneठाणे