शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

Coronavirus : कल्याणमध्ये दुकानदारांकडून बंदी आदेशाचे उल्लंघन, एका दुकानदाराविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 02:40 IST

कपडा, सोने-चांदी, चप्पल विक्रे त्यांचा समावेश होता. सकाळी ११ वाजल्यानंतर संबंधित दुकाने उघडी असल्याचे चित्र कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहायला मिळाले.

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार केडीएमसीने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, आस्थापना वगळता अन्य दुकाने आणि आस्थापने शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून बंद राहतील, असे आदेश गुरुवारी काढले होते; परंतु या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी पाहायला मिळाले. यात जीवनावश्यक वस्तू नसणारी दुकानेही चालू राहिल्याने अखेर पोलिसांनी रस्त्यावर उतरून संबंधित दुकानदारांना समज दिली. बंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी एका दुकानचालकाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव आणि प्रसार टाळण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार केडीएमसी हद्दीतील मॉल, नाट्यगृहे, चित्रपटगृह, शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवली गेली आहेत. सरकारी कार्यालयांनीही गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची अंमलबजावणी सुरू केली आहे. या नंतरही गर्दी कायम राहिल्याने केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सरकारच्या सूचनेनुसार दुकाने बंद ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले होते. मात्र, या बंदीतून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत; परंतु आदेशाकडे दुर्लक्ष करीत काही दुकानदारांनी आपली दुकाने चालूच ठेवली.यात कपडा, सोने-चांदी, चप्पल विक्रे त्यांचा समावेश होता. सकाळी ११ वाजल्यानंतर संबंधित दुकाने उघडी असल्याचे चित्र कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहायला मिळाले. त्यामुळे पोलिसांनी दुकानदारांना समज देत ती बंद करण्यास भाग पाडले. आदेशाचे उल्लंघन करणाºया दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी दक्ष नागरिकांनी केली आहे.राज्य सरकारच्या सूचनेनुसार आणि महापालिकेने जारी केलेल्या परित्रकानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकान वगळता इतर बहुतांश दुकाने शहरात बंद होती; परंतु रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ मात्र कमी झालेली नव्हती. दुपारी मात्र रस्त्यांवर शुक शुकाट दिसून आला.दरम्यान, बाजारपेठ पोलिसांची गस्त सुरू असताना बारदान गल्लीत शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता एक दुकानदार दुकान चालू ठेवून मालाची विक्री करताना आढळला. त्याच्याविरोधात पोलिसांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.रिक्षा बंदमुळे झाले हाल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक वाहतूक संदर्भात केलेल्या आवाहनानंतर कल्याणमधील रिक्षा शुक्रवारी दुपारी १:३० नंतर बंद करण्यात आल्या. मात्र, त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल झाले.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रमुख घटक म्हणून रिक्षाकडे बघितले जाते. दररोज अगणित प्रवाशांची वाहतूक रिक्षातून होत असते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करीत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील रिक्षा शनिवारी आणि रविवारी स्वच्छेने बंद ठेवाव्यात, असे आवाहन रिक्षाचालकांना केल्याची माहिती कोकण रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी दिली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण