शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: नौपाडा प्रभागात आयुक्तांचा पाहणी दौरा; कोरोनामुक्त रूग्णांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 02:39 IST

रोज एका परिसराला भेटीचा लावला सपाटा

ठाणे : रोज एकेका प्रभाग समितीला भेट देऊन तेथील कोरोनाची परिस्थिती समजून घेण्याचा सपाटा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी लावला असून बुधवारी चार तास नौपाडा प्रभाग त्यांनी पिंजून काढला. दौऱ्यात त्यांनी कोरोनामुक्त झालेल्या कोविड योद्धे यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.

बुधवारी सकाळी दहा वाजता आयुक्तांनी महापौर नरेश म्हस्के यांच्या समवेत कोपरी आनंदनगर परिसराची पाहणी केली. आनंदनगर येथे सुरू असलेले फिव्हर क्लिनिक, सार्वजनिक शौचालये, तसेच गल्ल्यांमध्ये जावून तेथील स्वच्छता, साफसफाई, नालेसफाई आदींची पाहणी केली. चेंदणी कोळीवाडा या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. कोळीवाडा परिसरातील एकविरा देवी मंदिर रोड, विठ्ठल मंदिर रोड, स्व. नारायणराव कोळी चौक, कोळीवाडा गाव, मीठबंदर रोड, चंद्रकांत नाखवा कोळी चाळ, सिमेंट गल्ली, युनायटेड स्पोर्टस, आनंदभारती, हरियाली तलाव, राऊत शाळा या परिसराची पाहणी केली. त्यांच्यासमवेत नगरसेवक भरत चव्हाण, स्थानिक नेते रमाकांत पाटील, माजी नगरसेवक गिरीष राजे, श्रुतिका मोरेकर आदी उपस्थित होते.

आयुक्तांनी बी केबीन, रेल्वे लाईन येथील प्रतिबंधित क्षेत्राचीही पाहणी केली. येथील कोरोनामुक्त झालेल्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेविका मृणाल पेंडसे, नम्रता कोळी आदी उपस्थित होते. जांभळी नाका मुख्य धान्य बाजाराचीही पाहणी केली. तसेच नागसेन नगर, खारटन रोडला भेट दिली. या ठिकाणी स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे आदी उपस्थित होते.

डॉ. शर्मा यांनी हाजुरी, मनोरूग्णालय परिसराची पाहणी केली त्यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगरसेविका सौ. नम्रता फाटक, माजी नगरसेविका आणि वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले आदी उपस्थितहोते. या दौºयात महापालिका आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपआयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, कार्यकारी अभियंता अमृतकर आदी उपस्थित होते. त्यांनीही नागरिकांकडून माहिती घेतली.भाईंदरपाडा येथील क्वारंटाइन सेंटरला दिली भेट

  • महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी भार्इंदरपाडा येथील क्वारंटाइन सेंटर तसेच होरायझन स्कूल येथील अ‍ॅसिम्टोमॅटिक कोविड हॉस्पिटला भेट दिली.
  • यावेळी त्यांनी तेथील डॉक्टर्सची संवाद साधला. तसेच त्या ठिकाणी देण्यात येणारे भोजन व इतर सुविधांसह रुग्णांना प्रोटोकॉलप्रमाणे औषधोपचार करण्यात येतातका, याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी न्यू होरायझन स्कूलमधील अ‍ॅसिम्टोमॅटिक हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांवरील उपचार व साफसफाई योग्य पद्धतीने केली जाते की नाही, याची पाहणी केली.
  • यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, डॉ. राजीव कोर्डे आदी उपस्थित होते.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस