शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कच्चा माल येणे बंद, अंबरनाथ एमआयडीसीमधील रासायनिक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 02:14 IST

अंबरनाथ एमआयडीसी भागात तब्बल हजाराहून अधिक कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने हे रासायनिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल हा चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो.

अंबरनाथ : अंबरनाथमधील औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने कच्च्या मालाअभावी बंद करण्याची वेळ आली आहे. तीन महिन्यांपासून कच्चा माल भारतात येत नसल्याने हे कारखाने बंद करावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा रासायनिक कारखान्यांना बसत आहे.अंबरनाथ एमआयडीसी भागात तब्बल हजाराहून अधिक कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने हे रासायनिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल हा चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो. मात्र, तीन महिन्यांपासून कच्चा माल भारतात येत नसल्याने या कंपन्यांना प्रक्रिया करण्यासाठी साधनसामग्री कमी पडत आहे. त्यातच कच्चा माल येत नसल्याने हे कारखाने बंद करण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती इतर कारखान्यांच्या बाबतीतही घडत आहे. एमआयडीसी भागातील अनेक कारखाने हे परदेशातून येणाºया कच्च्या मालावर अवलंबून आहेत.मात्र, कोरोनाच्या धोक्यामुळे सर्व व्यापार ठप्प झाल्याने त्याचा फटका औद्योगिक वसाहतीला बसला आहे. कंपनीमध्ये काम करण्यासाठी साधन नसल्याने कामगारांवर बसून राहण्याची वेळ येत आहे. तसेच तयार झालेला मालही परदेशात जात नसल्याने मोठ्या प्रमाणात तयार माल पडून आहे. गेल्या महिनाभरापासून औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनही मंदावले आहे. आता अनेक कारखान्यांना आपल्या कामगारांना सक्तीची सुटी देण्याची वेळ आली आहे.अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनीही या परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे. अंबरनाथमधील अनेक कारखानदारांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम केवळ उत्पादनावरच नव्हे तर कामगारांच्या रोजगारावरही पडणार आहे.रिक्षा राहणार बंदअंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकाने, रिक्षा उद्यापासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी पालिकेच्या सभागृहात बैठक झाली त्यात हा निर्णय झाला. रिक्षामधून संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत पूर्व भागात पाच आणि पश्चिम भागात पाच रिक्षा सुरु ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथMIDCएमआयडीसी